💥उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग...!



💥आज मंगळवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची मिळाली माहिती💥

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी 3 सप्टेंबर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,  मंगळवारी सकाळी ही भीषण आग लागली असून या आगीमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याआधी सोमवारी रात्री (2 सप्टेंबर) भेंडखळ-उरण येथील बामर लॉरी गोदामातील भरलेल्या कंटेनरमधील कपड्याला अचानक आग लागली होती. या आगीत कंटेनरमधील माल जळून खाक होऊन लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या