💥पुर्णेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना अभय ?



💥मस्तवाल दारु विक्रेत्यांकडून मनमानी दराने दारु विक्रीसह अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना दारु पुरवठा💥


पुर्णा/भल्या भल्या वाघांना निपटले कोल्ह्याचे काय ?  तालुक्यात मी वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अश्या आवेशात वावरत प्रत्येकाला गुर्मीची भाषा करणाऱ्या शहरातील एकमेव रवि जैस्वाल वाईन शॉप या परवाना धारक वाईन शॉपचे मालक रवि रतनलाल जैस्वाल यांच्या विरोधात जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मागील काळात एमआरपी दरा पेक्षा अतिरिक्त दराने दारुची विक्री करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या परंतु तक्रारदारांना राजकीय दबावतंत्रांचा वापर करीत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत तसेच वेळप्रसंगी संबंधित विभागातील अधिकारी व तक्रारदारांना आर्थिक तडजोड करुन प्रकरणावर पडदा टाकल्या गेल्याचे निदर्शनास येत आहे.संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध असल्याचे तसेच वेळप्रसंगी दोन चार लाख रुपयें लावण्याची ही माझी तय्यारी असल्याने माझे कुणीही काही वाकडे करणार नाही कुठे तक्रार करायची ते करा अशीही भाषा संबंधित वाईन शॉप मालक ग्राहकांना करीत असल्याने व शहरात एकमेव वाईन शॉप असल्याने नाईलाजास्तव ग्राहकांना मागेल ते दाम द्यावे लागत असल्याचेही काही ग्राहकांनी बोलून दाखवले.


शहरातील अतिसंवेदनशील तसेच दंगलग्रस्त परिसर असलेल्या तसेच प्रमुख बाजारपेठ असलेल्या लोकमान्य टिळकरोड,जुना मोंढा,महाविर नगर परिसरासह बसस्थानक रोड आदींसह पुर्णा-झिरोफाटा राज्यमार्ग क्र.२२९ या प्रमुख मार्गावर स्वतःसह नातेवाईक मंडळींच्या नावावर वाईन शॉप तसेच बिअरबा द्वारे देशी-विदेशी दारु विक्रीचे अधिराज्य निर्माण करणाऱ्या जैस्वाल कंपनीने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी आपल्या इशाऱ्यावर नाचविण्याचा अधिकार प्राप्त केला की काय ? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत असून संबंधित परवाना धारक वाईन शॉप मालक रवि जैस्वाल यांना राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे सातत्याने पाठबळ मिळत असल्यामुळे ते प्रत्येक ब्रँन्डच्या दारुची २० ते ३० रुपयें ज्यादा दराने विक्री करीत आहेत यात इंम्पीयर ब्ल्यू (आय.पी) प्रिंट रेट १४० रुपयें विक्री १६० रुपयें,रॉयल स्टेग (आर.एस.) प्रिंट रेट १९० रुपयें विक्री २१० रुपयें,अॉफिसर चॉईस (ओ.सी) प्रिंट रेट १२० रुपयें विक्री १४० रुपयें,मास्टर ब्लँड प्रिंट रेट १२० रुपयें विक्री १४० रुपयें,मॕगडॉल नंबर १ प्रिंट रेट १५० रुपयें विक्री १७० रुपयें,सिग्नीचर प्रिंट रेट ३०० रुपयें विक्री ३३० रुपयें,आर.एस बॕरल प्रिंट रेट २१० विक्री २३५ रुपयें,रॉयल चॕलेंज (आर.सी.) प्रिंट रेट २१० रुपयें विक्री २२० रुपयें,ब्लँडर प्रिंट रेट ३१० विक्री ३३० रुपयें,व्हाईट मिसचीफ प्रिंट रेट १८० रुपयें विक्री २०० रुपयें,बिअर प्रिंट रेट १६५ रुपयें विक्री १८० रुपयें तसेच प्रत्येक ब्रँडच्या ९० मिली बॉटलवर प्रिंट रेट पेक्षा २० रुपयें अतिरिक्त वसूल केले जात असून ब्लँडर युनीट प्रिंट रेट १२०० रुपयें विक्री १३०० रुपयें,इंम्पायर ब्ल्यू (आय बी)५६० रुपयें विक्री ५८० रुपयें,मास्टर ब्लँड ५०० रुपयें विक्री ५४० रुपयें, या आर्थिक लुटमारी मुळे मद्य ग्राहक त्रस्त झाल्याचे तर दिसतच आहे याशिवाय ज्या परिसरात जैस्वाल यांचे वाईन शॉप व वसंतलाल जैस्वाल यांचे देशी दारु दुकान आहे तो परिसर पोलीस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असून सदरील परिसर मागील अनेक दंगळींमध्ये होरपळलेला असल्यामुळे या अतिसंवेदनशील परिसराला या देशी-विदेशी दारु दुकानांमुळे तसेच ड्राय डे म्हणजे बंद काळात तसेच सदरील दुकाने उघडण्यापुर्वीच परिसरात संबंधित परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकान चालकांची मानसे पहाटे लवकरच ०४-०० वाजेच्या सुमारास अवैधरित्या देशी-विदेशी दारु विक्रीस सुरुवात करीत असल्याने परिसरातील जनजिवन अक्षरशः असुरक्षीत झाले असून मद्य प्राशन केलेले तळीराम येणाऱ्या जाणाऱ्या महिला शाळकरी विद्यार्थीनींना अत्यंत अर्वाच्च भाषेचा वापर करीत असुन परिसरातील व्यापाऱ्यांनाहीं त्रस्त करुन सोडत असल्यामुळे सदरील परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकाने परिसरातून गावाबाहेर हटवण्याची मागणी होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या