💥पहिल्या प्रयत्नात रशिया,अमेरिकेलाही चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये मिळालं नव्हतं यश...!💥इस्रोच्या विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होता. पण अगदी अखेरच्या क्षणी लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला💥

भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरशी अखेरच्या क्षणी संपर्क तुटल्यामुळे अनेकांच्या मनाला रुखरुख लागली आहे. हे लँडिंग यशस्वी झाले असते तर चंद्राबद्दल आजवर अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकली असती तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत जगातील चौथा देश ठरला असता. आपल्या पहिल्या प्रयत्नात हे यश अपेक्षित होते. पण रशिया आणि अमेरिकेने अनेक प्रयत्नांनंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळवले होते. मागच्या सहा दशकातील विविध देशांच्या चंद्र मोहिमांवर नजर टाकली तर आतापर्यंत ६० टक्के चंद्र मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत.अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाच्या ‘मून फॅक्ट शीट’ रिपोर्टनुसार आतापर्यंत १०९ चंद्र मोहिमांपैकी ६१ यशस्वी ठरल्या तर ४८ मोहिमांना अपयशाचा सामना करावा लागला. शनिवारी मध्यरात्री भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होता. पण अगदी अखेरच्या क्षणी लँडरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. जसे ठरवले होते तसे घडले नाही. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात इस्रायलने सुद्धा बेरेशीट लँडर चंद्रावर पाठवला होता. पण एप्रिल महिन्यात हा लँडर चंद्रावर कोसळला.१९५८ ते २०१९ या काळात भारतासह अमेरिका, यूएसएसआर (रशिया), जपान, युरोपियन युनियन, चीन आणि इस्रायल या देशांनी विविध चंद्र मोहिमांचे प्रक्षेपण केले. सर्वप्रथम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. पण पायोनिअरचे प्रक्षेपण अपयशी ठरले. ४ जानेवारी १९५९ रोजी रशियाच्या यूएसएसआर अवकाश संस्थेची लुना १ ही पहिली चंद्र मोहिम यशस्वी ठरली. पण हेयश त्यांना सहाव्या प्रयत्नात मिळाले होते. शीत युद्धाचा तो काळ होता. अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमध्य अन्य क्षेत्रांप्रमाणे अवकाशात यश मिळवण्याचीही स्पर्धा होती.ऑगस्ट १९५८ आणि नोव्हेंबर १९५९ या काळात दोन्ही देशांच्या १४ चंद्र मोहिमा झाल्या. त्यात लुना १, लुना २ आणि लुना ३ या रशियाच्या फक्त तीन चंद्र मोहिमा यशस्वी ठरल्या. १९६४ साली अमेरिकेच्या रेंजर ७ मिशनच्यावेळी पहिल्यांदा चंद्राचा जवळून फोटो काढण्यात आला. रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.या मिशननंतर पाच महिन्यांनी मे १९६६ मध्ये अमेरिकेने सुद्धा अशाच प्रकारची मोहिम यशस्वी केली. १९६९ साली अमेरिकेचे अपोलो ११ मिशन तर ऐतिहासिक ठरले. त्यावेळी पहिले मानवीपाऊल चंद्रावर पडले. १९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या. १९८० ते ८९ या काळात चंद्रावरजाण्याची ही स्पर्धा थांबली. त्यानंतर जपान, युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्रायलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. २०००९ ते २०१९ या काळात एकूण दहा चंद्र मोहिमा झाल्या.
[07/09, 10:38 p.m.] Nandu Naik: पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल – इस्रो प्रमुख
__________________________________

चंद्रावर लँडिंगच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी शनिवारी सांगितले. लँडर बरोबर जो संपर्क तुटला त्यासाठी मिशनच्या शेवटच्या टप्प्यात चुकीच्या पद्धतीने झालेली अंमलबजावणी जबाबदार असल्याचे सिवन म्हणाले. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना संपर्क तुटला. शेवटच्या टप्प्यात योग्य पद्धतीने प्रक्रिया पार पडली नाही. त्यावेळी आमचा संपर्क तुटला असे सिवन म्हणाले. त्यांनी दूरदर्शनाला मुलाखत दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत असे सिवन यांनी मुलाखतीत सांगितले. त्यांच्या भाषणामधून आम्हाला प्रेरणा मिळाली. विज्ञान निकाल पाहत नाही पण प्रयोग चालू असतात आणि प्रयोगामधूनच निकाल मिळतात हे मोदींचे वाक्य खूप महत्वाचे होते असे सिवन म्हणाले. चांद्रयान २ चा अन्य मोहिमांवर अजिबात परिणाम होणार नाही. आम्ही अनेक प्रकल्पांवर काम करत आहोत. हा आमच्यासाठी झटका नाही. आम्ही पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या