💥पुर्णेत शिवसेनेतर्फे श्री.गणेश महोत्सवानिमित्त गणेश मंडळांसाठी विविध स्पर्धांसाठी दिड लाखांची बक्षिसे...!💥शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम यांनी कायम ठेवली शिवसेना गणेश महोत्सव स्पर्धा-पारितोषिक वितरणाची परंपरा💥

पूर्णा/मागील अनेक वर्षापासून श्री.गणेश महोत्सव काळात शिवसेनेच्या वतीने शिवसेना गणेश महोत्सव फेस्टीवलचे आयोजन करण्यात येते प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेनेच्या वतीने श्री गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत प्रथम-द्वितीय-त्रितीय येणाऱ्या गणेश मंडळांसह स्थानिक सजावट तसेच प्रोत्साहन पर असे सुमारे दिड लक्ष रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहिती आयोजक शिवसेना शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांनी दिली आहे.
        गणेश उत्सवानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेनेच्या वतीने भरगच्च स्पर्धांचे आयोजन केल्या गेले आहे.यावर्षी एक लक्ष पंचवीस हजारांचे रोख व पंचवीस हजारांचे चषक विजेत्यांना पारितोषिक दिल्या जाणार आहेत.स्थानिक सजावटीसाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खा.संजय उर्फ बंडू जाधव चषक व एकवीस हजार ,पंधरा हजार व सात हजाराचे पारितोषिक,उत्कृष्ट धार्मिक देखावा जिल्हा प्रमुख विशाल कदम चषक व पंधरा हजार ,अकरा हजार व सात हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार आहे ,उत्कृष्ट सामाजिक देखावा स्पर्धा नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे चषक व पंधरा हजार ,अकरा हजार व सात हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार आहे ,उत्कृष्ट गणेश मुर्ती ,शांतता व सुव्यवस्था ,बाल गणेश मंडळ यांनाही बक्षिसे दिल्या जाणार आहेत.गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना नगरसेवक शामराव कदम यांच्या कडून तीन पैठण्या दिल्या जाणार आहेत.अशा प्रकारे दिड लक्ष रुपयाहून अधिकचे बक्षिसे दिल्या जाणार आहेत.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (ता.१३ ) सायंकाळी सात वाजता खासदार संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण होणार आहे.यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम ,नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे ,संतोष एकलारे ,काशीनाथ काळबांडे ,सुधाकर खराटे ,साहेब कदम,प्रमोद एकलारे ,रवी जैस्वाल,नगरसेवक श्यामराव कदम ,ॲड.राजेश भालेराव,भगवान सोळंके,आनंद अजमेरा ,निलेश जैस्वाल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती मुख्य संयोजक तथा शिवसेना शहर प्रमुख मुंजाजी कदम ,युवा सेना तालुका प्रमुख आप्पा बनसोडे,शहर प्रमुख विकास वैजवाडे,विद्यानंद तेजबंद ,प्रा.जगन्नाथ कदम, प्रा.गंगाधर खाकरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या