💥पुर्णेतील रेल्वे कॉलनी परिसरातील श्री.बाळ सिध्दीविनायक गणेश मंडळाच्या देशभक्तीला सलाम...!



💥देशासाठी विरमरण पत्करुन शहिद झालेल्या विरजवानांच्या कुटुंबाचा व मा.सैनिकांचा केला सत्कार💥

पुर्णा/शहरातील हरी नगर,पंचशील नगर,रेल्वे कॉलनी परिसरातील युवकांनी स्थापण केलेल्या श्री बाळ सिद्धीविनायक गणेश मंडळाने विविध सांस्कृतिक,धार्मिक,व देशभक्ती कार्यक्रमांसह विविध स्पर्धा खेळांचे आयोजन करुन शहरातील अन्य गणेश मंडळां समोर एक आदर्श निर्माण केल्याचे दिसत असून देशबांधवांसाठी सिमेवर अहोरात्र पहारा देत देश-देशवासीयांसाठी वेळ प्रसंगी प्राणांची आहूती देणाऱ्या विर जवानांच्या प्रति प्रत्येक भारतीया आदर असायलाच हवा असा मोलाचा संदेश देत श्री बाळ सिद्धीविनायक गणेश मंडळाने दि.११ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री ०८-०० वाजेच्या सुमारास मा.सैनिक तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबातील मान्यवर सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 सदरील कार्यक्रमास पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पो.नि.सुभाषराव राठौड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली यावेळी सन १९६५ च्या भारत-पाकिस्तान युध्दा मध्ये परभणी-हिंगोली या तत्कालीन संयुक्त जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील (परभणी) मौ.गौर येथील शहीद झालेले एकमेव विरजवान श्री सूर्यकांत नामदेवराव जोगदंड यांच्या कुटुंबातील श्री.विजय जोगदंड,ताडकळस ता.पुर्णा येथील शहीद विरजवान बालाजी अंबोरे यांचे वडील श्री.भगवान माधव राव अंबोरे,सुभेदार श्री.पांडुरंग मोहिते, सुभेदार श्री. संभाजी कापूरे,सुभेदार श्री.नारायण बुचालें,हवालदार श्री. बालकिशनआण्णा नाईक,श्री.मन्नुसिंह ठाकूर नाईक,   श्री.रामचंद्र भोसले हें सेवानिवृत मा.सैनिक आदी सत्कारमुर्तीचा यावेळी हृदयस्पर्षी सत्कार करण्यात आला
अत्यंत देशभक्तीपर आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पो.नि.श्री सुभाष राठौड़ साहेब श्री अंबादास काळे , श्री सज्जन लाल जैस्वाल , श्री दिनेश चौधरी ,श्री सुधीर मलदोडे,श्रीमती प्रणिता दीदी,पूजाताई अम्बोरे , आशाबाई मोहिते,मा.नगरसेवक सुनिल जाधव उपस्तीत होते गणेश मंडळा तर्फे विविध सांस्क्रुतिक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात परंतु श्री बाळ सिद्धी विनायक गणेश मंडळा तर्फे वेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये उपस्तीत सर्व माझी सैनिकांना प्रथमतः गार्ड ऑफ हॉनर देऊन व्यासपीठा पर्यंत आणण्यात आलें तद्द नंतर कार्यक्रमाचे संयोजक हवालदार मेजर सुधीर जाधव यांच्या हस्ते सर्व माझी सैनिक व सैनिक कौटुंबियानच्या स्वागत सत्कार व सन्मान करण्यात आला व सांस्क्रुतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आलें श्री राहुल काळे यांनी देश भक्ती गीत गायले तर शुभम घोरपडे ,व आकाश घोरपडे यांनी व्यक्तिक व समूह देशभक्तीपर नृत्य सादर केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.महेश जाधव सूत्र संचलन शिवप्रसाद देवने तर आभार दीपक बुरड यांनी केले कार्यक्रमांच्या यशश्वीतेसाठी अध्यक्ष कुंदन ठाकूर उपाध्यक्ष वैभव दुधाटे,सचिव शिवम राठोड,कोषाध्यक्ष पवन दुधाटे आशिष राजकुंडल, सदस्य सूरज जाधव,करन माने,सुरेश बगाटे,अजय वाघमारे,सोनू पवार,भावेश चावडा,क्रुष्णा निमलु,रीतीक बूण्दूले,विशाल ढगे,नेमिचन्द माने,अभिजीत गायकवाड,शुभम जोगदंड,व्यवस्थापक उमेश जाधव,सय्यद गौस,बबलु जाधव,आदींनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या