💥पुर्णेतील मुख्य रस्त्यावरील जर्दा दुकान चोरट्यानी फोडले,४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला...!
💥दुकानावरील टिनपत्र कापून चोरट्यांचा दुकानात प्रवेश,सिगार-बिडी-जर्दा बॉक्ससह नगदी रक्कमही पळवली💥 

पुर्णा/शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सातत्याने सुरु असून मागील महिण्यात २२ अॉगस्ट २०१९ रोजी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा मा.नगरसेवक नासीर थारा यांच्या घरी झालेल्या संशयास्पद चोरीला अवघे पंधरा दिवसही उलटत नाही तोच शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या समोरील एका कन्फेक्शनरी दुकाना (जर्दा दुकान) वरील टिन पत्रे कापून चोरट्यांनी दुकानात घुसखोरी करीत गल्ल्यातील चिल्लर व बिडी सिगार जर्दा बॉक्स आदीं साहीत्यासह गल्ल्यातील नगदी रक्कम पळवल्याची चोरुन घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की शहराला जोडणारा प्रमुख मार्ग असलेल्या बसस्थानक रोडवरील भारतीय स्टेट बँके समोर अतिक अहमद निहाल अहमद रा.कुरेशी मोहल्ला यांची कन्फेक्शनरीचे दुकान (जर्दा दुकान) असून नेहमीप्रमामे ते व त्यांचे वडील निहाल अहमद मंगळवार दि.०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले होते.आज बुधवार दि.०४ रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास दुकान उघडल्यावर मध्यरात्री कोणीतरी आज्ञात चोरट्यांनी दुकाना वरील टिन पत्रे कापुन दुकानात प्रवेश करीत दुकानातील विविध कंपन्यांचे सिगारेट बाॅक्स,मजुर बीडी बाक्स व गल्ल्या तील ३ ते ४ हजार रुपये चिल्लर पैसे असा अंदाजीत ४०,८२० रुपये किंमतीचे साहित्य पळवून नेले असल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती त्यांनी पुर्णा पोलीसांना दिली.यावरुन पो.नि.सुभाष राठोड, फौजदार पंढरी गंधकवाड,समीर पठाण, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.व तातडीने परभणी येथील श्र्वान पथक व ठसे तज्ञांना प्राचारण केले. नेमका किती माल चोरीस गेला याची शहानिशा,पंचमाना करुन गुन्हा दाखल करत असल्याचे पो.नि.सुभाष राठोड यांनी सांगितले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या