💥परभणी येथे भारतीय भटक्या विमुक्त परिषदेची आत्मचिंतन बैठक संपन्न...!



💥आत्मचिंतन बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुधीर अनवले,राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी/परभणी येथील सुपर मार्केट भागातील वसंतराव नाईक महाविद्यालयात आज रविवार दि.८ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ०१-३० वाजेच्या सुमारास भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास परिषदेच्या वतीने आत्मचिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील आत्मचिंतन बैठकीस परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.सुधीर अनवले यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष तथा पुर्णा नगर परिषदेचे मा.नगरसेवक सुनील जाधव हे उपस्थित होते.

यावेळी आत्मचिंतन बैठकीस उपस्थित भटक्या विमुक्त समाज बांधवांना मार्गदर्शन करते वेळी प्रा.सुधीर अनवले म्हणाले की भटके विमुक्तांची चळवळ हीं मानव मुक्तीसाठी असून अठरा पगड जाती जमातीच्या व भटक्या विमुक्तांनी या चळवळीत मोठ्या संख्येने सहभाग नोदवून चळवळ यशस्वी करावी असे ही प्रा.अनवले म्हणले भटक्या विमुक्त समाजावर होणारे अत्याचार यापुढे कद्दापी सहन केले जाणार नाही आमचा लढा हा भटक्या विमुक्तांच्या न्याय-हक्कासाठी असून हा लढा आम्ही अधिक प्रबळ करणार असल्याचेही ते म्हणाले या आत्मचिंतन बैठकीत भटक्या विमुक्त समाजाची सध्याची परिस्थिती यावर चिंतन करण्यात आले

बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.अनवले यांनी बैठकीचे आयोजक आनंद वंजारी यांची भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदावर तर औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदावर दिलीप मते यांची निवड करण्यात आल्याची यावेळी घोषणा केली यावेळी बैठकीस सिख सिकलकरी समाजाचे प्रतिनिधी रेड्डीसिंघ बावरी,गोसावी समाजाते प्रतिनिधी शिवप्रसाद भारती,ॲड.नरेश भारती,भटक्या विमुक्तांचे नेते माणिकराव अंधारे,बंजारा समाजाचे प्रतिनिधी श्रीराम चव्हाण,घिसडी समाजाचे प्रतिनिधी गणेश पवार,पारधी समाजाच्या प्रतिनिधी सौ.सरस्वतीबाई पवार,गणेश मेडे,रामचंद्र शिंदे,भुजंग शिराळे आदींसह असंख्य मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या