💥परभणी जिल्हा वृत्तपत्र क्षेत्रातील निर्भिड व जेष्ठ पत्रकार अशोक कुटे यांचे दुःखद निधन...!


 💥माजलगाव तालुक्यातल्या भाटवडगाव येथे आज सकाळी ०९-०० वाजता त्यांचा अंत्यविधी💥 

आपल्या लेखणी वाणी आणि मोठ्या जनसंपर्काच्या आधारावर परभणी जिल्ह्यात ज्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कोरले आणि सर्वसामान्यांचा मित्र म्हणून एवढेच नव्हे तर लोकांच्या अडीअडचणीला मदतीला धावणारा एक मित्र म्हणून असणारे अशोक कुटे रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्यातून निघून गेले....
परभणी जिल्ह्याच्या पत्रकारितेचा क्षेत्रातील एक तारा निखळला...... तसेच यावेळी  आज परभणी - पुर्णा येथील पत्रकारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली........

. ते धाराजी भुसारे (पत्रकार) यांच्या बहिणीचे पती आहेत.
अशोक कुटे याचं माजलगाव निधन झाले.अंत्य विधी सकाळी ९ वा भाटवडगाव ता माजलगाव जिल्हा बिड येथे 

 कुटे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते.. तरी देखील पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी कार्यरत राहून अनेकांना मार्गदर्शन केले महालक्ष्मी सणानिमित्त ते माजलगाव येथे परवाच परभणी येथून गेले .....
रात्री अचानक अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या