💥पूर्णा श्री विसर्जन मिरवणूकिस शांततेत सुरवात...!💥धार्मिक देखावे पाहण्यासाठी महिला व अबाल वृध्दांची मोठ्या संख्येने उपस्थिती पोलीसांचा चोख बंदोबस्त💥 

पूर्णा/गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गगनभेदी जयघोषात पूर्णा शहरासह ग्रामीण भागातही श्री विसर्जन मिरवणूकीस शांततेत सुरवात झाली सायं.०७-००वाजेच्या सुमारास मुख्य मिरवणुकीस सुरूवात झाली देखावे पहाण्यासाठी महिला अबाल वृध्दांसह नागरिकांची प्रथमत प्रचंड संख्येने उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले.
   शहरात श्री विसर्जनास दुपार पासून सुरुवात झाली आडत व्यापारी गणेश मंडळ,सुवर्णकार गणेश मंडळ, नागराज गणेश मंडळ,सिद्धीविनायक गणेश मंडळ आदी गणेश मंडळाचे सांयकाळी विसर्जन झाले मुख्य विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी धार्मिक व सामाजिक देखावे सादर केले देखावे पाहण्यासाठी बालगोपालांसह महिला मोठया संख्येने उपस्थित झाल्याचे पाहावयास मिळाले
    गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पो.नि.सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुख्य मिरवणुकीत मंडळांला जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांचे आदेश असल्याने साउंड बॉक्स न लाऊ देण्याच्या कारणावरून मंडळाच्या कार्यकर्त्या कडून नाराजी निर्माण झाली होती परंतु पो.नि.सुभाष राठोड व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,मा.नगरसेवक साहेब कदम,मा.शहरप्रमुख नितीन कदम,नगरसेवक शाम कदम,नगरसेवक ॲड.राज भालेराव,यांच्या प्रयत्ना नंतर वाद निवळला व मिरवणूक सुरळीत सुरु झाली..
-------------------------------------------------------------
पूर्णा नगर परिषदे कडून गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपिठावर पो.नि.सुभाषराव राठौड,मा.नगराध्यक्ष उत्तमराव कदम,नगराध्यक्षा सौ.गंगाबाई सितारामआप्पा एकलारे यांचे प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,नगरसेवक चाँदसाहेब बागवान,अखील अहेमद,मा.नगरसेवक अनिल खर्गखराटे आदी मान्यवर..
-------------------------------------------------------------
i

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या