.💥..तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन...!



💥चांद्रयानाचं लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा,मी त्यातले काही रिट्विट करेन - पंतप्रधान मोदी

भारताच्या इतिहासात आजची मध्यरात्र सुवर्णक्षरांनी लिहिली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोनंपाठवलेलं 'चांद्रयान-२'आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी देशवासीय उत्सुक आहेत. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय. चांद्रयानाचं लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा, मी त्यातले काही रिट्विट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय. 'चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतरचांद्रयान-२ ची गती कमी करण्यात येणार आहे. 'लँडर विक्रम'ला चंद्राच्या भूमीवर उतरवणं अतिशय आव्हानात्मक आहे. ती १५ मिनिटं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. आतापर्यंत ४ चक्रव्यूह यशस्वीपणे भेदणारं चांद्रयान हे आव्हानही पार करेल, असा विश्वास देशवासीयांना आहे. परंतु, या १५ मिनिटांत इस्रोच्या शास्त्रज्ञांना सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. या सॉफ्ट लँडिंगनंतर चंद्रावर पोहोचणार भारत चौथा देश ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-२ चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. त्याआधी त्यांनी काहीट्विट करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, अभिनंदन केलं आहे. चांद्रयान-२ चं लँडिंग अधिकाधिक देशवासीयांनी पाहावं, या हेतूने मोदींनी जनतेला एक ऑफर दिली आहे. हे लँडिंग पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यास मोदी तो ट्विट करणार आहेत. '१३० कोटी देशवासीय ज्या क्षणाची वाट बघत आहेत, तो काही तासांवर आला आहे. देश आणि जग पुन्हा एकदा आमच्या शास्त्रज्ञांची शक्ती पाहील',घा असं मोदींनी म्हटलंय...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या