💥शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिला मौ.आहेरवाडीतील पिडीत कुटुंबाला मायेचा आधार..!


💥आहेरवाडीतील खंदारे यांच्या जळालेल्या घराची पाहणी करुन विशाल कदम यांनी संसार उपयोगी वस्तु दिल्या भेट💥 

पुर्णा/तालुक्याती मौ.आहेरवाडी येथील शेतकरी रामराव मारोतराव खंदारे यांच्या राहत्या घराला आज मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने या भयंकर आगीत त्यांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य शेती उपयोगी वस्तू तसेच कपडे व अन्य धान्य संपूर्णपणे जळून खाक झाले सुदैवाने घरी कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरीही या आगीत घराचे अंदाजे ७० ते ७५%नुकसान झाले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.
परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांनी पिडीत रामराव खंदारे यांच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक जाणीवेतून विशाल कदम यांनी खंदारे कुटुंबाला तातडीने संसार उपयोगी साहित्य भेट देऊन मायेचा आधार दिला.यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या सोबत पुर्णेचे शिवसेना शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम युवा सेना तालुका प्रमुख बंडू आप्पा रामजी भालेराव,कैलास मुळे,अनंता मोरे,शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या