💥काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक...!💥सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे💥

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषे नजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत.या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सुरक्षा दल असे प्रयत्न हाणून पाडत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पाकिस्तानी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान त्यांना अटक करण्यात यश आले आहे. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच  300 ते 350 अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे. तर गेल्या दोन आठवड्यांत 40 ते 50 अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आह..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या