💥पुर्णेतील डोबी गल्लीतील जुन्या मटन मार्केटची जागा संत रविदास सांस्कृतिक सभागृहास देण्याची मागणी..!💥राष्ट्रीय चर्मकार महासंघ व युवा सेनेने केली नगर परिषद प्रशासनाकडे मागणी💥 

पुर्णा/शहरातील डोबी गल्ली परिसरात असलेल्या जुन्या मटन मार्केटची इमारत संपूर्णतः मोडकळीस आली असून या मार्केटचा वापर शहरातील अधिकृत मांस विक्रेते करीत नसल्यामुळे यावर परिसरातील काही लोक बेकायदेशीर कब्जे करण्याचा प्रयत्न करीत आहेत करीता नगर परिषद प्रशासनाने ही जागा संत शिरोमनी रविदास महाराज सांस्कृतिक सभागृहास देऊन या जागेवर नगर परिषद प्रशासनाने संत रविदास महाराज सांस्कृतिक सभागृह बांधून चर्मकार समाजाला समाज मंदिर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे नगर परिषदे मुख्याधिकारी ढाकणे यांच्याकडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आज शनिवार दि.२१ सप्टेंबर रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास केली असून चर्मकार महासंघाने केलेल्या या रास्त मागणीस पाठींबा देत याच सुमारास युवा सेनेचे शहरप्रमुख विकास वैजवाडे यांनी नगर परिषद प्रशासनास लेखी स्वरुपात निवेदन देऊन जुन्या मटन मार्केटची जागा संत शिरोमनी रविदास महाराज सांस्कृतिक सभागृहास देण्याची मागणी केली असून निवेदनावर असे नमूद केले आहे की तात्काळ मागणीची पुर्तता न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या