💥बुलढाणा जिल्ह्यात विहिरीत आढळून आले आईसह चार मुलींचे मृतदेह...!💥जिल्ह्यातील माळेगावातील घटना,आत्महत्या की हत्या हे अद्याप उघड झाले नाही💥

एका विहिरीत आईसह चार मुलींचे मृतदेह आढळून आल्याने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माळेगावात ही घटना घडली आहे. दरम्यान,ही आत्महत्या आहे की, हत्या हे अद्याप उघड झाले नसून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मेहेकर तालुक्यातील माळेगाव परिसरातअसलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. हे वृत्त गावात धडकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, विहिरीत आढळलेले पाच मृतदेह एका आईसह चार मुलींचे आहे.त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
आई उज्वला ढोके (वय ३५), मुलगी वैष्णवीढोके (वय ९), दुर्गा ढोके (वय ७), आरुषी ढोके (वय ४), पल्लवी ढोके वय (एक वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले जाणार आहेत. पोलिसांनी घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या