💥पुर्णेत शांतता समितीची बैठक संपन्न.जि.पो.अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती..!


💥सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता माजवणाऱ्यांची गय करणार नाही - कृष्णकांत उपाध्याय 


पूर्णा;गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेने शांतता व संयमाने सण,महोत्सव साजरे करावेत.जातीय सलोखा राखावा, कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी,असे आवाहन परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांनी आज पुर्णा शहरात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले.
       शहरातील सुमन मंगल कार्यालयात आज शनिवार दि.०७ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत पुर्णा पोलीस स्थानकाच्या वतीने कर्तव्यदक्ष पो.नि.श्री.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीत उपस्थित श्री गणेश महोत्सव पदाधिकारी,व्यापारी,प्रतिष्ठित नागरिक,शांतता समिती सदस्यासह जमलेल्या मान्यवर मंडळींना मार्गदर्शन करतांना श्री.उपाध्याय बोलत होते.यावेळी ते म्हणाले की सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता माजवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतेवेळी पोलीस प्रशासन कुणाचीही गय करणार नाही यावेळी श्री.उपाध्याय यांनी शांतता समितीच्या सदस्यांचा शांतिदुत म्हणून सन्मान केला व म्हणाले की या ठिकाणी एवढे शांती दूत असताना पोलिसांचे काम नाही.सर्व धर्मियांनी एकत्रितपणे गणेशोत्सव शांततेत साजरा करावा असेही ते म्हणाले.

विसर्जन मिरावणुकीत लहान मुलांना सोबत घेताना काळजी घेण्याचे आवाहन ही त्यांनी केले.विसर्जन मिरवणूकीत पोलीस प्रशासन डिजेचा प्रयोग करू देणार नाही,पारंपरिक वाद्याचा वापर करावा,वाहनांची तपासणी करावी,कोल्हापूर सांगली परिसरात पूर स्थिती साठी मदत केली आपण ही मदत करण्यासाठी पुढे यावे असेही ते म्हणाले.यावेळी शांतता समिती बैठकीस आवर्जून उपस्थित असलेले भदन्त उपगुप्त महाथेरो यांनीही विशेष मार्गदर्शन केले यावेळी बोलतांना ते म्हणाले की मर्यादा पाळून सर्वांनी सण उत्सव साजरे करावे,जपान,कोरिया सह अनेक देशात पोलीसांचे काम पडत नाही या देशाचा आदर्श आपणही घ्यावा संघर्षाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत असेही ते म्हणाले यावेळी शहरातील जेष्ठ समाजसेवक तथा आरोग्य तज्ञ श्री.दत्तात्रय वाघमारे साहेब म्हणाले की
सर्वनिक उसत्व सर्वांनी मिळून साजरे करायला हवेत या वेळी मंचावर तहसिलदार श्याम मदनुरकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले भदंन्त उपगुप्त महाथेरो,पेशईमाम शमीम रिजवी पो.नि.सुभाष राठोड, जेष्ठ समाजसेवक डाॅ.दत्तात्रय वाघमारे,जेष्ठ समाजसेवक प्रतिष्ठित व्यापारी सितारामअप्पा एकलारे,स.पो.नि. रामचंद्र नागरगोजे, विशाल बहात्तरे, फौजदार चंद्रकांत पवार,महेश लांडगे,आदींची उपस्थीती होती.पुढे बोलताना कृष्णकांत उपाध्याय यांनी उपस्थित शांतता समीतीच्या सदस्यांना, गणेश मंडळांच्या कार्य कर्त्यांना सुरक्षा, स्वच्छता,जातीय सलोखा, गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विशेष सुचेना दिल्या.तर सोशल मेडीयावरुन कोणीही अक्षेपार्य विधान करु नये असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष राठोड,सुत्रसंचलन जगदीश जोगदंड,आभार प्रदर्शन चंद्रकांत पवार यांनी केले.यावेळी शहरातील पत्रकार,राजकिय, सामाजीक, गणेशमंडळाचे कार्यकर्ते, महीला शांतता समीती सदस्य आदींची मोठ्या संख्येने उपस्थीती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या