💥परभणी जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरा बाबत बंदीचे आदेश लागू...!   💥परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी जारी केले आदेश💥                

      परभणी, दि. 23 :-  परभणी, दि. 22 :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे.

निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवुन मोठ्या आवाजातुन प्रचार केल्यास ध्वनीप्रदुषण होणे, सर्व सामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्रीपर्यंत ध्वनीक्षेपन यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे या बाबींवर निर्बंध घालण्यासाठी जिल्ह्यात आदेश लागू केले आहेत.

      परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही, सकाळी 6.00 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10.00 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, तसेच सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि ईतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. असे निर्बंध घातले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27.10.2019 पर्यंत) अंमलात राहतील. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 317                                                      दि. 23  सप्टेंबर 2019

                         मोटार गाड्या व वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध

परभणी, दि.23 :-  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम  घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थीतीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या/वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत, आणि ज्याअर्थी परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

        परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर,  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27.10.2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

वृत्त क्र. 318                                                      दि. 23  सप्टेंबर 2019

निवडणूक कालावधीमध्ये जात,धर्म आणि

भाषावार शिबीरांच्या आयोजनास प्रतिबंध

परभणी, दि.23 :-  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात,भाषा आणि धार्मिक शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबीरांचे आणि मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27.10.2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीवर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 319                                                    दि. 23  सप्टेंबर 2019

धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणीक संस्था व सार्वजनिक

ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध

परभणी, दि. 23 :-  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

      परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आदेशित केले आहे की, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणीक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27-10-2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 320                                                      दि. 23  सप्टेंबर 2019

मर्यादीत व्यक्ती व वाहनांना नामनिर्देशन दाखल

करते वेळी मिळणार प्रवेश; आदेश लागू

      परभणी, दि. 23:-  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.21 सप्टेंबर  2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दाखलनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणने ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

      परभणीचे जिल्हादंडाधिकारी  पी.शिवशंकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत परभणी जिल्हयात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

हे आदेश दिनांक 21 सप्टेंबर 2019 चे सकाळी 6.00 वाजले पासून दिनांक 27 ऑक्टोबर 2019 चे 24.00 वाजेपर्यंत संपुर्ण परभणी जिल्ह्यात आमलात राहतील.

वृत्त क्र. 321                                                      दि. 23  सप्टेंबर 2019सार्वजनिक ईमारत, रस्ता तसेच रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही असे आदेश लागू

      परभणी, दि.23:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.21-9-2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डींग्ज, कमाणी लावणे या व ईतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध लादण्यात आल्याचे आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीचे साहीत्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27/10/2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे आदेश एकतर्फी ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.-

*-*-*-*-

वृत्त क्र. 322                                                      दि. 23  सप्टेंबर 2019

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यास निर्बंध

परभणी, दि. 23 :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दिनांक.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आल्याने परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याची  खात्री झाली असून त्यावर एकतर्फी आदेश काढून निर्बंध घालण्यात आले आहेत.

  परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर, यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की,  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27/10/2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे  एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*

वृत्त क्र. 323                                                   दि. 23  सप्टेंबर 2019

सार्वजनिक मालमत्ता विरुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई आदेश लागू

 परभणी, दि. 23 :-  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दिनांक.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अमलात आलेली आहे. माझे असे निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती/संस्था यांचेकडुन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावुन शहराचे विरुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती/संस्था यांचेकडुन होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावुन शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महानगरपालीका, नगरपालीका व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर (नष्ट) करुन ईमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहीराती तात्काळ काढुन घेणे आवश्यक आहे.

       त्याअर्थी जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशाकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27-10-2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 324                                                    दि. 23  सप्टेंबर 2019

प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनावर पक्ष प्रचाराचे फलक,

झेंडे लावण्याबाबत निर्बंध

परभणी, दि. 23:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि. 21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला असून निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. या निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावणे, ईत्यादी बाबीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासुन 2 फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही, प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा ईतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही, फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनीधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरीक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

      हे आदेश निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27-10.2019 पर्यंत) अंमलात राहतील. तसेच प्रत्येक ईसमावर आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे आदेश एकतर्फी ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 325                                                     दि. 23  सप्टेंबर 2019

                        खाजगी, सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध

परभणी, दि. 23:- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक-2019 साठी कार्यक्रम दि.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, ईत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, ईमारत, आवार, भिंती ईत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, ईमारत, आवार, भिंत ईत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगीशिवाय व संबंधीत परवाना देणार्‍या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27/10/2019 पर्यंत) निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 326                                                    दि. 23  सप्टेंबर 2019

कार्यालये व विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका

काढण्यास तसेच घोषणा देणे, सभा घेण्यास निर्बंध

  परभणी, दि.23 :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.21 सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणार्‍याने, उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनीधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे. निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीने, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृतीस निर्बंध लादण्यात आले आहेत.

जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर, यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्दारे वरील ठिकाणी वरीलप्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.27/10/2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले आहे. सदरील देश दि.21 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या