💥ताडकळस सर्कल मधील शेतकऱ्यांची सोयाबीन पीक शेंगा परिपक्व होण्या अगोदरच पडली पिवळी...!



💥सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त💥 

धानोरा काळे,प्रतिनिधी

पुर्णा/तालुक्यात सतत होत असलेल्या पावसाने व वातावरणात होत असलेले रोजचे बदल यामुळे ताडकळस सर्कल मधील धानोरा काळे या गावासह परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेंगा परिपक्व होण्या अगोदरच सोयाबीन पीक पिवळे पडत आहे यामुळेे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसत आहे.
 

   
  धानोरा काळे सह परिसरात यावर्षी वेळेवर पाऊस झाला नाही काही शेतकऱ्यांनी मोठी हिमत करून पेरणी केली हलकास पाऊस पडत गेला पिके कशी बशी जगली परंतु उशिरा का होईना बैल पोळ्याला जोरदार पाऊस झाला अन् पिके जोमदार डोलू लागली यामुळे लवकर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगा परिपक्व होत आहेत परंतु उशिरा पेरणी केलेले  सोयाबीन एंशी ते पांच्याऐंशी दिवसाचे असून सध्या शेंगा भरण्याची अवस्था आहे परंतु अज्ञात विषाणूजन्य रोगाने सोयाबीन दाने भरण्या अगोदरच वाळत असल्यामुळे हाताला आलेले पीक जाते की काय ?
 या  चिंतेत असून शेतकऱ्याचे मोठे  आर्थिक नुकसान होण्याचे शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या