💥नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारु तस्करी विरोधात धाडसी कारवाई...!💥13 लाख 18 हजार 480 रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त💥

नांदेड/राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूक पुर्व आदर्श आचार संहिता लागू झाली असतांनाही अवैध देशी-विदेशी दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक निलेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारु विक्री विरोधात कठोर शोध मोहीम राबविली जात असतांना आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड शहरातील नाथ नगर मधून तब्बल 13 लाख 18 हजार 480 रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून हा दारूसाठा नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोहोचविण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे .
निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात दारू चा पुरवठा केला जातो तो पुरवठा रोखण्यासाठी निवडणूक विभाग जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात प्रो गुन्हे शोधून काढून कारवाई करण्यासाठी पाच पथकाची स्थापना करण्यात आली आहे . या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोवा येथे तयार करण्यात आलेली इंपिरियल ब्ल्यू, मॅक्डोल नंबर वन चा दारू साठा नाथ नगर मध्ये उतरविण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती . मिळालेल्या माहितीचा आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज  नाथ नगरात छाप टाकून 13 लाख 18 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नागेश घोटाळे याच्या घरी हा साठा सापडला असून त्याच्याकडे अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता नांदेड लातूर रोडवरील हॉटेल गुरुकृपा धाबा पार्टी शिवारातील हॉटेल दोस्ती बोर्ड खांबेगाव होटेल स्वरांजली व जगदंबा माळाकोळी आणि राहेर तालुका नायगाव येथील हॉटेल अजिंक्य येथेही गोवा निर्मित विदेशी मद्याचा साठा दिले असल्याची कबुली दिली .या माहितीवरून पोलिसांनी छापे टाकून हा दारू साठा जप्त केला .निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेला हा छापा अवैद्य दारू विक्रीला लगाम तर संबंधितांचे धाबे दणाणले असल्याचे सांगितले जाते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या