💥पुर्णेचे पो.नि.सुभाषराव राठौड यांनी २ लाखांचे दागीने पळवणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात...!💥परभणी येथील औद्योगिक वसाहतीतून आरोपी शंकर पवार याला अवघ्या अर्ध्या तासात अटक💥

परभणी/ जिल्ह्यातील पूर्णा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरिक्षक पदाचा पदभार स्विकारलेले व अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाचा ठसा जनसामान्याच्या मनावर उमटवणारे कर्तव्यदक्ष पो.नि.सुभाषराव राठौड यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण करुन सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण केले असून सर्वसामान्य जनतेला तसेच व्यापाऱ्यांना भयमुक्त वातावरणाचा आभास करुन दिला असून प्रत्येक गुन्ह्यांचा सखोल तपास करीत अनेक प्रकरणांचा उलगडा करण्याचे आव्हानात्मक कार्य पुर्णा पोलीस प्रशासनातील अधिकारी आणी कर्मचाऱ्यांनी पार पाडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत पो.नि.सुभाष राठोड यांनी पोलीस स्थानकाचा कारभार सुधारत जबरदस्त कामगिरीची नोंद केली आहे.

पो.नि.सुभाषराव राठौड व सहकारी कर्मचाऱ्यांच्या धाडसी व यशस्वी कामगिरीत पुन्हा एक भर पडली असून दि.०८ सप्टेंबर २०१९ रोजी तालुक्यातील मौ.सुहागण येथील सोने-चांदी दुकानदार हनुमान भोसले हे आपणे हयातनगर येथील दुकान बंद करुन आपल्या मोटार सायकल वरुन गावाकडं येत असतांना ०६-२० वाजेच्या सुमारास सुहागण गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील आवई गावाचे शिवारात अज्ञात आरोपीने पाठीमागून कारमधून येऊन फिर्यादी हनुमान भोसले व सोबत मोटारसायकलवर असलेल्या त्यांच्या भावाला पाठीमागून धडक देऊन खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्यांच्या जवळील दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागीने असलेली पिशवी व जवळील मोबाईल असा २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना घडली होती सदरील घटनेला अवघा अर्धा पाऊन तासही होत नाही तोच जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.राठौड सहकारी फौजदार गंधकवाड तसेच हट्टा पोलीस स्थानकाचे सपोनि.वाघमोडे यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत सर्वत्र नाकाबंदी करुन आपले पथक पाठवून घटनेतील आरोपी शंकर पवार याला मुद्देमालासह परभणी येथील औद्योगिक वसाहतीतून ताब्यात घेण्याची धाडसी कार्यवाही केली.त्यांच्या या धाडसी कारवाईचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या