💥परभणी जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात तस्करी,निवडणूक काळात प्रमाण वाढले...!



💥राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निश्क्रियते मुळे जिल्ह्यात वैध-अवैध देशी विदेशी दारु विक्रेते बेलगाम💥 

परभणी/जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निश्क्रिय धोरण व अकार्यक्षमवृत्ती मुळे जिल्ह्यातील परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेते बेलगाम झाल्याचे दिसत असून संबंधित परवाना धारक किरकोळ देशी-विदेशी दारु विक्रेते आता जिल्ह्यात सर्वत्र होलसेल दारुची विक्री करुन अवैध देशी-विदेशी दारुल  विक्रीला प्रोत्साहन देत असल्यामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र खानावळीच्या नावावर बेकायदेशीर देशी-विदेशी दारु अड्डे राजरोसपणे चालतांना पाहावयास मिळत असून सर्वत्र दुचाकी-चारचाकी वाहणांतून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुची तस्करी होतांना दिसत असून यात पुर्णा-पालम-गंगाखेड-जिंतूर तालुक्यात या देशी-विदेशी दारु तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.संबंधित तालुक्यांमध्ये राजरोसपणे अवैध देशी दारू विक्रेत्यांची चंगळ असते परंतु संबंधित अवैध देशी-विदेशी दारु विक्रेते आणी तस्करांना आता आचार संहितेची सुध्दा भिती आणी प्रशासनाचा ही धाक राहिला नसल्या मुळे खुलेआम मोटार सायकल वर अवैध देशी-विदेशी दारुची केली जात आहे अश्याच पध्दतीने जिंतुर तालुक्यात मोटारसायकल वरुन दारु तस्करी करणाऱ्या एका दारु तस्करास आडगाव फाटा येथे दारू बॉक्स घेऊन जात असतांना त्याच्याकडील दारु बॉक्स जप्त करून त्या ओरोपी वर  जिंतुर पोलीसांकडून कार्यवाई करण्यात आली परंतु सदरील जप्त मुद्देमाल कोणत्या परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानदाराच्या दुकानातील आहे याची सखोल चौकशी करण्यासाठी बॕच क्रमांकाची चौकशी होणे अत्यंत आवश्यक असून ज्या परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानदाराच्या दुकानातील मुद्देमाल आहे त्या अवैध देशी विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या ठोक विक्रेत्यांवर कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक रविकिरण कोल्हे संबंधित परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.संबंधित तस्कराकडून जप्त केलेले तब्बल ५ दारुचे बॉक्स ज्या परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्याने अवैध दारु विक्रेत्याला बेकायदेशीर पणे विकलेच कसे ? या प्रश्नाचा उलगडा होणे आवश्यक असून संबंधित परवाना धारक दारु विक्रेता तालुक्यात अवैध दारु विक्रीला प्रोत्साहन देत असल्याने त्याचा परवाना रद्द करुन त्यालाही अवैध दारु विक्रीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी करणे आवश्यक असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या दिशेने ठोस पावले उचलने आवश्यक झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या