💥वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी करण्यासाठी मतदानाची ताकद दाखावा - आनंदराज आंबेडकर



💥पुर्णेत आयोजित भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सव सोहळ्या वेळी ते बोलत होते💥

पुर्णा/लोकसभेत आपल्या एकोप्याची  शक्ती मतातुन  दाखवली त्याप्रमाणेच विधानसभा मतदानाच्यावेळी वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी करण्यासाठी मित्राला सोबत घेउन मतदानाची ताकद दाखावा असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.

        येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सास्कृतिक सभागृहात मंगळवार दि.१७ रोजी रिपब्लिकन सेना पूर्णा आयोजित भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सव सोहळ्या निमित्ताने आनंदराज आंबेडकर मार्गदर्शन करत होते . कार्यक्रमाचे उदघाटक आनंदराज आंबेडकर , अध्यक्ष रीपब्लिकन सेना राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे , जि प सदस्या सौ . करुणाताइ कुंडगीर , आनंद नेरलीकर , माधव जमदाडे ,  दादा राऊत , दिलिप खरात , आशिष वाकोडे किरण घोंघडे , कराटकचे राजु मोरे , दादाराव पंडित , उत्तम खंदारे , अनिल खर्गखराटे , धम्मा जोंधळे , महेबुब कुरेशी , शामराव जोगदंड , त्रिंबक कांबळे , हिरानंद गायकवाड तालूकाअध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी अदीची प्रमुख उपस्थी होती .


       शहरातील टी पॉईंट येथुन रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना मोटार सायकल व कार वाद्य वाजवून मिरवणूक काढून नेरलीकर निवासस्थान येथे भैय्यासाहेब आंबेडकर व कवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सभागृहात करण्यात आली . आंबेडकर नगर येथे रिपब्लिकन सेना नामफलकाचे अनावरण प्रमुख अतिथीयांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमास आलेल्या नागरीकांनसाठी शाहीर चंद्रकांत धुतमल परभणी  यांच्या सुमधुर गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध करण्यात आले . कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी आकाश अहिरे , चंद्रमुनी लोखंडे , प्रेमानंद ढगे , पंचशिला वाघमारे ,शोभाताई डोंगरे , संघमित्रा जोंधळे , विकास अहिरे  या सह इतर तरूण मंडळीने यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक राजकुमार सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन शाहीर विजय सातोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन रुपेश राजभोज यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या