💥मंगरुळपिर पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला शस्त्रासह घेतले ताब्यात...!



 💥शहरातील अशोकनगर भागातून आरोपी आकाश उर्फ आक्या सीताराम वायले यास शस्त्रासह केली अटक💥

मंगरुळपिर ता ९:  मंगरुळपिर पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील अशोकनगर भागातून ता ९ रोजी एका इसमाकडून शस्त्रे जप्त केली असून आरोपीला अटक करून त्याला ता ९ रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीची पोलीसांनी तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
                मंगरुळपिर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ता ९ रोजी गुप्त माहिती मिळाली की शहरातील अशोकनगर भागातील एक इसमाच्या घरी विना परवाना शस्त्र असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सदर इसमाच्या घरी ता ९ चे दुपारी १ वाजता छापा मारला असता त्याच्या घराच्या मागील स्वयंपाक खोलीत लोखंडी कपाटा मागे एक तलवार,एक लोखंडी कोयता,लोखंडी पाईप व रामपुरी चाकू असा ऐकून ४४५० रुपयांचे शस्त्र अवैद्यरित्या व विनापरवाना लपवून ठेवलेली पोलिसांना सापडली यावरून मंगरुळपिर पोलीसांनी आरोपी आकाश उर्फ आक्या सीताराम वायले वय २८ रा अशोकनगर याला ताब्यात घेऊन त्याचेवर कलम ४/२५ आर्म्स ऍक्ट व मुंबई पोलीस कायदा १३५ नुसार गुन्हा दाखल करून ता ९ रोजीच त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलिसांनी त्याची वाशिम च्या तुरुंगात रवानगी केली सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपअधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या आदेशानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप व ठाणेदार विनोद दिघोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे,पोलीस उपनिरीक्षक सोनोने   डी बी पथकाचे अमोल मुंदे,मो. परसुवाले, साहेबराव राऊत,अंबादास राठोड,रवी वानखेडे,सुनील गंडाईत,सचिन शिंदे,मिलिंद भगत यांनी कारवाई केली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या