💥राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नुतन अधिक्षक कोल्हेंनी केली कारवाई नाट्याची रंगीन तालीम...!💥पुर्णा तालुक्यात हॉटेल व्यवसायाच्या आड अवैध दारु विक्रेत्यावर तर गंगाखेड येथे मद्य सेवनाचा परवाना न पाहता दारु विक्री केल्या प्रकरणी कारवाई💥

परभणी/जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक पदाची नुकतीच सुत्रे स्वीकारलेले अधिक्षक
 रविकिरण कोल्हे यांच्या कारवाई नाट्याच्या रंगीन तालीमेस सुरुवात झाली असून संबंधित अधिकारी कोल्हें यांनी चोर सोडून सन्याश्याला फासी देण्याचा कारभार आरंभल्याचा प्रत्यय नुकताच निदर्शनास आला असून  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक कोल्हे यांनी जिल्ह्यातील परावाना धारक तसेच अवैध दारु विक्रेत्यांवर आपल्या कर्तृत्वाची छाप पडावी याकरिता दि.२४ सप्टेंबर २०१९ रोजी पुर्णा तालुक्यातील मौ.कावलगाव येथील हॉटेल उर्मिला या हॉटेल व्यवसायीकावर अवैध दारु विक्री केल्या प्रकरणी तर गंगाखेड तालुक्यातील नक्षत्र रेस्टॉरंट अँड बार  यांच्यावर मद्य सेवनाचा परवाना न पाहता दारु विक्री केल्या प्रकरणी कारवाई नाट्याची रंगीन तालीम करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकण्याचा भिम पराक्रम गाजवल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
परभणी जिल्ह्यात अवैध व्यवसायात आघाडीवर असलेल्या पुर्णा तालुक्यात अवैध देशी-विदेशी दारुची प्रचंड प्रमाणात विक्री होते या अवैध देशी-विदेशी दारु विक्रीचा सुत्रधार तसेच एकमेव वाईन शॉप परवाना धारक तालुक्यातील राजकीय क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांच्या सामाजिक कार्यक्रमांना किरकोळ आर्थिक पुरवठा करुन पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर वेळोवेळी दबाव तंत्राचा वापर करीत आपला काळा कारभार राजरोसपणे चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध देशी-विदेशी बोगस दारुचा बेकायदेशीर पुरवठा करुन अतिसंवेशील पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात महात्मा गांधी तंटा मुक्त अभियानाची घंटा वाजवत भयंकर वादाला कारणीभूत ठरणारा तालुक्यातील एकमेव अवैध मद्य विक्रीचा सुत्रधार कोण ? या गंभीर प्रश्नाचा उलगडा करण्याचे धाडस परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक रविकिरण कोल्हे यांना अखेर सुचलेच कसेनाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाचा कारभार अत्यंत भ्रष्ट व अकार्यक्षम असल्याचे निदर्शनास येत असून  झिरोफाटा-पुर्णा राज्यमार्ग २२९ या मार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आर्थिक तडजोडीतून मान्यता दिलेल्या किंग बिअर बार व समाधान बिअर बार या अगदी रोडटच असलेल्या बिअरबार ला परवानगी देतांना परिसरात वाहण पार्कींगची व्यवस्था आहे किंवा नाही याची पडताळनी न करता सामान्य वाहण चालक व ग्राहकांचा जिव धोक्यात घालून परवानगी दिली कशी ? असा प्रश्न उपस्थित होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नुतन अधिक्षक रविकिरण कोल्हे यांनी तात्काळ  संबंधित बिअरबार रेस्टॉरंटची परवानगी रद्द करावी तसेच खानावळीच्या नावावर अवैध देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करतेवेळी संबंधित जागा मालकांना सह आरोपी करुन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या