💥हभप.अच्युत महाराज यांचे शनिवारी पडेगावात किर्तन...!💥वारकरी संप्रदायाचे पाईक कै. दत्तराव बोबडे यांच्या 21 व्या पुण्यतिथीनिमित्त हे कीर्तन होणार आहे💥

 गंगाखेड -तालुक्यात वारकरी संप्रदायाचे वैभव ह-भ-प अच्युत महाराज किरडे यांचे शनिवारी सात सप्टेंबर रोजी पडेगाव येथे कीर्तन होत आहे.
पडेगाव येथील ज्येष्ठ नागरिक तथा वारकरी संप्रदायाचे पाईक कै. दत्तराव बोबडे यांच्या 21 व्या पुण्यतिथीनिमित्त हे कीर्तन होणार आहे. पडेगाव येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सकाळी 11 ते 1 कीर्तन होणार असून लगेच महाप्रसाद होणार आहे. तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्यानबा बोबडे, सोनबा बोबडे पडेगावकर यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या