💥राष्ट्रवादी काँग्रेस नविन चेहर्यांना संधी देणार का...?



💥पक्षातील दिग्गजांनी पवारांची साथ सोडल्यानंतर युवक नेतृत्व पुढे येत आहे💥

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांनी पवारांची साथ सोडल्यानंतर युवक नेतृत्व पुढे येत आहे.याचाच प्रत्यय बीडमधील पवारांच्या दौऱ्यात आला आहे. पवार यांनी आपल्या बीडमधील दौऱ्यात राष्ट्रवादीचे 5 उमेदवार जाहीर केले. या 5 उमेदवारापैकी 4 उमेदवार हे तरुण आहेत. तसेच, आपल्या दौऱ्यातही पवारांकडून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.जळगावयेथील दौऱ्यातही जळगाव ग्रामीणसाठी एका युवक नेतृत्वाने पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणमधून विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचं आव्हान होतं. मात्र, घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्यामुळे देवकरांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे. देवकरांचं नाव मागे पडणार म्हणून नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी नुकतेच शरद पवार यांची भेट घेतली. तसेच, जळगाव ग्रामीण विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात चर्चाही केला आहे. मीशरद पवारांचे आशीर्वाद घेतल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरु म्हटलं आहे. त्यामुळे जळगाव मधून गुलाबराव देवकरांच्याजागी कल्पिता पाटील यांना संधी मिळणार का? याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. कल्पिता पाटील या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच असल्याचं समजते. तसेच, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षाही आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या