💥शिवसेना आ.डॉ.राहूल पाटील व मा.आमदारपुत्र सुरेश नागरे समर्थकात घोषणाबाजी..!



💥जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला💥

परभणी/विधानसभा निवडणूकीची घोषणा ही झाली नाही तोच राजकीय सुडनाट्याला खतपाणी घालण्यास सुरवात झाली की काय ? असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.प्रत्येक वेळी धार्मिक आणी सामाजिक उत्सवांच्या वेळी होणारा वाद हा दोन राजकीय पुढाऱ्यांच्या वर्चस्वाला पोषक असला तरीही सर्वशसामान्य जनता आणी समर्थक आणि विरोधक म्हणून मिरवणाऱ्या अती उत्साही तरुणांसाठी मात्र घातक ठरणाराच म्हणावा लागेल ना ? परभणी शहरातील शिवाजी चौक परिसरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ.राहुल पाटील आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे भुतपुर्व मा.आ.स्व.कुंडलीकराव नागरे यांचे सुपूत्र तथा काँग्रेसचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार सुरेश  कुंडलिकराव नागरे यांच्या समर्थकांत जोरदार घोषणाबाजी झाली दोन्ही गटांतील अती उत्साही समर्थक एकमेकांना भिडण्याच्या तयारीत होते.त्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे विसर्जन मिरवणुकीतील दोन्ही नेत्यांचे स्टेज समोरासमोर असल्यामुळे जरा जास्तच गदारोळ माजला.विसर्जन मिरवणूकी दरम्यान प्रचंड गोंधळाचे व भितीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पथकासह घटनास्थळाकडे धाव घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरीही विधानसभा निवडणूकीला काही दिवसांचा कालावधी राहीला असतांना परभणी शहरासह जिल्ह्यात राजकीय दहशतवादाला खतपाणी घालून कायदा व सुव्यवस्थेला प्रचंड धोका निर्माण करण्याचा कुटील डाव कोण रचत आहे ? या गंभीर प्रश्नाचे अचूक उत्तर शोधण्याचे आव्हान पोलीस प्रशासना समोर उभे टाकल्याचे दिसत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या