💥पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे..!💥नागरिकांना आता अर्ज न करताही मिळेल पॅन कार्ड💥

पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्जदेखील केलेला नाही.आधार कार्ड आहे आणि त्याचा क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना प्राप्तिकर विभागाकडून स्वतःहून पॅन कार्ड प्रदान केले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना करसंरचनेत आणण्यासाठी किंवा कर चुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र, अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाहीत. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्डमुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती.तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्डविषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी, सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या