💥पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकऱ्याच्या घराला लागली आग...!💥आगीत घरातील संसार उपयोगी साहित्यासह धन धान्यही जळून खाक💥

पुर्णा/तालुक्यातील मौ.आहेरवाडी गावातील शेतकरी  रामराव मारोतराव खंदारे यांच्या राहत्या घराला आज मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.आगीचे स्वरुप अत्यंत तिव्र असल्यामुळे घरातील जीवन आवश्यक वस्तुंसह धनधान्य जळुन खाक झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्थानिक गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने काही प्रमानात विझली परंतु घराचा जवळपास ७०% भाग जळाल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य शेती उपयोगी साहित्य तसेच खान्याचे सामायन धनधान्य कपडे जळून खाक झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.यावेळी गावातील पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे यांनी पिडीत कुटुंबाला तात्काळ भेट देऊन त्यांना धिर दिला असुन तहसिलदार पुर्णा यांची भेट घेऊन पिडीत कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या