💥पत्नीनेच कापला हात,मुलाने उडवले शीर,सरकारी नोकरीसाठी निर्घृण हत्या...!💥उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर शहरातील भयंकर घटना💥

सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. मात्र उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एका व्यक्तीची त्याच्या पत्नी आणि मुलानेच निघृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अनुकंपा म्हणून नोकरी मिळावी या उद्देशाने तेजराम या५९ वर्षीय व्यक्तीची त्याच्या पत्नी आणि मुलाने हत्या केली आहे. या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजराम हे बहुपूर येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. पुढील वर्षी म्हणजे २०२० साली ते निवृत्त होणार होते. मात्र अचानक एक दिवस त्यांच्या मृतदेह तीन तुकडे केलेल्या अवस्थेमध्ये कचराकुंडीत सापडल्याने ते राहत असलेल्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली. सुरुवातीपासूनच पोलिसांना तेजराम यांची पत्नी मेमवती आणि मुलगा कपिल यांच्यावर संक्षय होता. संक्षयाच्या आधारे पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली. पहिल्या काही प्रश्नानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर या दोघांनी आपणच तेजराम यांची हत्या केल्याचे सांगत गुन्हा कबुल केला. ‘माझे पती लवकरच निवृत्त होणार होते. त्यांची नोकरी माझ्या मुलाला मिळावी अशी माझी इच्छाहोती. सरकारी नोकरी आणि निवृत्ती वेतन मिळावे यासाठी आम्हीच त्यांची हत्या केली,’ अशी कबुली मेमवती यांनी दिली.या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १४ सप्टेंबर रात्री तेजराम जेवत असताना अचानक त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. पत्नीने तेजराम यांचा एक हात कापला. तेजराम तडफडत जमीनीवर पडले. त्याचवेळी कपिलने त्यांचे शीर धडापासून वेगळे केले. त्यानंतर कपिलने त्यांचा पाय कापला. रात्रीच त्यांनी या मृतदेहाचे तुकडे जवळच्या कचराकुंडीमध्ये टाकून दिले. मात्र सकाळी तेजराम यांच्या मृतदेहाचे तुकडे कचराकुंडीत अढळल्याने एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या