💥शहरासह ग्रामीण भागातील अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात होतोय दारुचा पुरवठा💥
पुर्णा/शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी-विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री करणाऱ्यांना देशी-विदेशी दारुचा होणारा पुरवठा अखेर करतोय तरी कोण ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्या इतपत सखोल तपासच होत नसल्यामुळे शंकेची पाल चुकचुकतांना दिसत असून नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन शहरातील काही अधिकृत परवाना धारक शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी-चारचाकी वाहणांतून अवैधरित्या देशी-विदेशी दारुची तस्करी करीत असल्याने ग्रामीण भागात महात्मा गांधी तंटा मुक्ती योजनेचा वेळोवेळी घंटा वाजतांना पाहावयास मिळत आहे तर अतिसंवेदनशिल शहर म्हणून शासन दरबारी नोंद असलेल्या पुर्णा शहराचा अतिसंवेदनशिलतेचा कलंक जास्तच गडद होतांना पाहावयास मिळत आहे.
शहर परिसरातील अधिकृत परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन सन-उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती महोत्सवच्या दिवशी जिल्हा प्रशासनाकडून ड्रायडे अर्थात दारु बंदी घोषित असतांनाही मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारु पुरवठा सोईस्कर रित्या केल्या जात असल्याने सन-उत्सवांना गालबोट लागत असल्याचे व कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.शहरी भागात परवाना धारक देशी दारुची तिन दुकाने असून अत्यंत संवेदनाशील व दंगलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील लोकमान्य टिळक रोडवर वसंतलाल जैस्वाल यांची देशी दारु दुकान आहे तर शास्त्री नगर परिसरालगत स्टेशन रोडवर अजमेरा यांची देशी दारु दुकान आहे तर पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग,शासकीय ग्रामीण रुग्नालय,न्यायालय,तहसिल कार्यालय अशी अनेक महत्वाची सरकारी कार्यालय असलेल्या पुर्णा-ताडकळस रोडवर परवाना धारक मालक संतोष अण्णा गौड यांचे देशी दारु दुकान आहे.सदरील दुकान मालकच दि.१२ सप्टेंबर २०१९ रोजी गणपती विसर्जन मिरवणूक चालू असतांना विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत ८१ सिलबंद भिंगरी देशी दारू बॉटल ज्याची किंमत ४२१२ रुपयें व देशी दारु विक्री करुन जमा झालेले ४१२० रुपयें अश्या एकूण ९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतला होता.शासकीय ड्रायडे घोषित असतांना संबंधित परवाना धारक तालुक्यात अवैध देशी-विदेशी दारु विक्री करुन किंवा अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात दारुचा पुरवठा करीत असतांना मागील दोन वर्षात अनेक गुन्हें उघडकीस आले.परंतु जप्त करण्यात आलेला देशी-विदेशी दारुचा साठा नेमका कोणत्या अधिकृत परवाना धारक दारु विक्रेत्याचा आहे याचा तपास लावण्याची तसदी ना पोलीस प्रशासनाने केली ? नाही परभणी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ? एकंदर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग तर संपूर्णतः परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांच्या आर्थिक मोहफासात अडकल्याचे भयंकर चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहावयास मिळत असून शहरातील एकमेव वाईन शॉप असलेल्या जैस्वाल वाईन शॉप विरोधात दुकान मालक जैस्वाल प्रत्येक ब्रँडच्या दारु बॉटलवर एमआरपी दरापेक्षा अतिरिक्त दर आकारत असल्यासंदर्भात तसेच बनावट दारु विक्री करीत असले संदर्भात ग्राहकांनी अनेक तक्रारी केल्यानंतर हीं जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वेळोवेळी थातूरमातूर तपास करुन किंवा संबंधित तक्रारदाराकडून लेखी स्वरुपात समाधान झाल्याचे व तक्रार वापस घेतल्याचे लिहून घेऊन संबंधित दारु दुकानदाराला क्लिनचीट देत असल्याचे पाहावयास मिळत आहे अश्या तक्रारदारांवर दारु विक्रेते राजकीय दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचे किंवा खोटे गुन्हें दाखल करण्याची धमकी किंवा आर्थिक प्रलोभनाचे अस्त्रही वापरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.एकंदर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्षतेसह विश्वसनीयतेवर हीं गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे..
0 टिप्पण्या