💥छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित जोगींचा मुलगा अमित जोगीला अटक...!



💥अमित यांच्यावर जन्म दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप💥 

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी मंगळवारी अमित जोगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अमित जोगी यांच्यावर जन्म दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अमित जोगी विरोधात गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय दंड विधान कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुत्रांच्या माहितीनुसार, अमित जोगी यांना आता न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. राज्यातील 2013 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मरवाही विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित जोगी यांनी बनावट जातवैधता प्रमाणपत्र दिल्याची तक्रार करण्यात आली होती. याच मतदारसंघात त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाच्या उमेदवारसमीरा पैकरा यांनी ही तक्रार केली होती. मीडियाच्या रिपोर्टनुसार, अमित जोगी यांनी निवडणुकीत आपले शपथपत्र सादर करताना जन्म स्थान ग्राम सारबहरा गौरेला दाखवले होते. पण, त्यांच्या जन्म 1977 मध्ये टॅक्सासमध्ये झाल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्चस्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अजित जोगी यांचे कंवर आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या