💥पुर्णा तालुक्यात एकोनीस महिण्याच्या कालावधीत अवैध दारु विक्री संदर्भात ५० गुन्ह्यांची नोंद....!


💥फेब्रुवारी २०१८ ते सप्टेंबर १९ पर्यंत १७५७ बॉटल देशी-विदेशी दारु अर्थात १,०८९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

पुर्णा/संपूर्ण मराठवाड्यात अतिसंवेदशील तालुका म्हणून शासन दफ्तरी नोंद झालेल्या पुर्णा तालुक्याला लागलेला अतिसंवेदनशीलतेचा कलंक जास्तच गडद करण्याचे दुष्कृत्य अवैध देशी-विदेशी दारु माफिया करीत असल्याचे निदर्शनास आले असून जिल्हा प्रशासनाने ड्रायडे घोषित केल्यानंतर ही धार्मिक सन-उत्सव तसेच महापुषांच्या जयंती महोत्सवाच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात दारु साठा पुरवून सार्वजनिक उत्सवांना गालबोट लावण्याचे निच कृत्य शहर परिसरातील अधिकृत परावाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेतेच करीत असल्याचे मागील काही घटनांत उघडकीस आले आहे.
तालुक्यात अवैध देशी-विदेशी दारु विक्रीने उच्चांक गाठला असून १७ फेब्रुवारी २०१८ ते १२ सप्टेंबर २०१९ या १७ महिण्यांच्या कालावधीत पुर्णा पोलीस स्थानकात सुमारे अर्धा शेकडा अर्थांत पन्नास गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलीस प्रशासनाने अवैध देशी-विदेशी दारु विक्री विरोधात केलेल्या कारवाईत १७५७ देशी-विदेशी दारु बॉटल साठा ज्याची किंमत १,०८९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस प्रशासनाने कारवाई केली खरी परंतु जप्त माला संदर्भात परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जप्त केलेला मुद्देमाल नेमका कोणत्या परवाना धारक देशी-विदेशी दारु दुकानदाराच्या दुकानातून अवैध दारु विक्रेत्याला अर्थात गुन्ह्यातील आरोपीला पुरवण्यात आला आहे याची सखोल चौकशी न केल्याने संबंधित परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांची हिंमत कमालीची वाढलेली पाहावयास मिळत असून जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध देशी-विदेशी दारु तस्करांच्या आर्थिक मोहफासात अडकल्याचे पाहावयास मिळत आहे.
 राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीकारांच्या अकार्यक्षम व संशयास्पद कारभारामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात असंख्य दुचाकी-चारचाकी वाहणांतून मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारुची तस्करी होत असून सदरील देशी-विदेशी दारुचा साठा अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना गावोगाव पुरवला जात असून या अवैध देशी-विदेशी दारु तस्करी मागे शहरातील परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्याचा हात असल्याचे बोलले जात आहे.या अवैध देशी-विदेशी दारु तस्करीत मोठ्या प्रमाणात बनावट दारु अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना पुरवठा होत असल्याने अनेकांची कुटुंब उध्वस्त होतांना पाहावयास मिळत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या