💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे जि प शाळेत निघाल्या खिचडीत आळ्या....!
💥शालेय पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांच्या जिवीताशी खेळ 💥

पांगरा ढोणे प्रतिनिधी

पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे  जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे याशाळे मध्ये दोनशे विद्यार्थी संख्या असून 23 सप्टेंबर रोजी शालेय पोषण आहार दररोज शिजवला जातो त्यामध्ये दुपारी साडेबारा वाजता शालेय पोषण आहार वाटप केल्यानंतर पहिलीच्या वर्गात शिकत असलेली कुमारी अंजली शिवाजी ढोणे. व श्रद्धा शिवाजी ढोणे. ह्या दोघी बहिणी खिचडी सोबत खात असताना त्या डब्यामध्ये तीन आळ्या आढळून आल्या त्यांनी हा प्रकार त्यांच्या आईला सांगितला आणि त्यांनी लगेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष  यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तो खिचडी चा डबा तसाच ठेवा असे सांगितले त्यांची पुढील चौकशी केली जाईल असे सांगितले दररोज विद्यार्थी दुपारचा डबा न आनता शाळेमधील खिचडी दरोज मनसोक्त खात असतात तर अशा जर आळ्या निघत असतील तर विद्यार्थी-वद्यार्थिनी कसा खाऊ खायचा अशी शंका

 विद्यार्थ्यांमध्ये पसरली.......
खाऊ शिजवण्यासाठी दोन महिला व एक पुरुष असून त्यांनी स्वच्छ तांदूळ पाखडुन व निर्मळ धूवुन स्वच्छता राखायला हवी असे मत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.रेखा ढोणे यांनी पुण्यनगरी शी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या