💥पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील सराफा व्यापारी लुट प्रकरणातील आणखी १ आरोपी जेरबंद...!


💥मुद्देमाल घेऊन पसार झालेला आरोपी माधव मोरे यास लेबर कॉलनी नांदेड येथून घेतले ताब्यात💥

पुर्णा/तालुक्यातील सुहागन येथील सराफा व्यापाऱ्यास कारणे धडक देऊन डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्याच्या जवळील २,११०००/-रुपयांचा मुद्देमाल लुटण्याची घटना ०८ सप्टेंबर २०१९ रोजी घडली होती या घटनेतील ५ दरोडेखोरांपैकी आणखी एकास पुर्णा पोलीसांनी धाडसी शोध मोहीम राबवत आज सोमवार १६ सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील लेबर कॉलनी परिसरातून जेरबंद केले आहे.
      पुर्णा-हयातनगर रोडवर सुहागन येथील सराफा व्यापारी हनुमान भोसले व त्यांच्या भावास हयातनगर येथून सुहागन कडे येत असताना आव्हई शिवारात कार मधुन आलेल्या ५ अज्ञात दरोडेखोरांनी दुचाकीस कारची धडक देऊन डोळ्यात मिरचीची पुड टाकून लाथाबुक्क्यांनी दगडाने मारहाण करुन तब्बल २ लाख २१ हजारांचे  सोन्या चांदीचे दागीने लुटून पसार झाले होते. त्यातील एक आरोपी अनिल पवार यास पुर्णा पोलीसांनी त्याच्या कारसह अवघ्या अर्धा पाऊन तासात घेण्याची धाडसी कारवाई केली होती तर या घटनेतील चार आरोपी मुद्देमाल घेऊन पसार झाले होते.यापैकी माधव काळबा मोरे रा.देगांव ता.नायगांव जि.नांदेड हा फरार असलेला आरोपी नांदेड शहरातील लेबर काॅलनीत असल्याची माहीती पुर्णा पोलीसांना मिळाली.पुर्णा पो.नि. सुभाष राठोड यांच्या आदेशाने फौजदार चंद्रकांत पवार,नितीन वडकर,विष्णु भिसे,निलेश पोते यांच्या पथकाने नांदेड येथिल लेबर काॅलनी भागात छापा मारुन  माधव काळबा मोरे यास जेरबंद केले.याप्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत व यात चोरी गेलेले दागीने ही हस्तगत करणे बाकी आहे त्यांना कधी अटक होणार याकडे लक्ष लागले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या