💥परभणी जिल्ह्यात निवडणूक कालावधीत शस्त्र परवाना धारकांनी शस्त्र जमा करण्याचे आवाहन...!💥निवडणुकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आदेश जारी💥

परभणी, दि. 23:-  भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांचे कडून आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम दिनांक 21- सप्टेंबर 2019 रोजी घोषीत केला आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 कार्यक्रम घोषीत केल्यापासून आदर्श आचार संहीता अंमलात आली आहे. परभणी जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुक कालावधीत शस्त्र परवाना धारकाकडून शस्त्र जमा करतांना मार्गदर्शक सुचना निर्गमीत केल्या आहेत.

त्या प्रमाणे जिल्ह्यात शस्त्र परवाना धारकाकडून शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करणे आवश्यक आहें. या बाबत छाननी समितीची बैठक घेण्यात येणार आहे. काही परवाना धारकांना निवडणुक कालावधीत शस्त्र निवडणुक काळात जमा करण्यापासून सवलत (सुट) देण्या बाबात लवकच शस्त्र छाननी समितीची बैठक घेवून त्या बाबात निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या शस्त्र परवाना धारकांना शस्त्र जमा करण्यापासून सवलत (सुट) आवश्यक आहे. त्यांनी त्यांचे जवळील शस्त्र जमा करण्यापासून सवलत (सुट) मिळण्याबाबत सबळ कारणासह दिनांक 25 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत अर्ज सादर करावा. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या