💥उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मां करणार शिवसेनेत प्रवेश..!💥संध्याकाळी सहा वाजता प्रदीप शर्मा हातावर बांधणार शिवबंधन,नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी ?💥

पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमक फेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी सहा वाजता प्रदीप शर्मा हातावर शिवबंधन बाधणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीसाठी नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नालासोपार्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मुद्दा लक्षात घेता प्रदीप शर्मा यांना शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या