💥पुर्णा पोलीस गुटखा प्रकरातील आरोपींना अवैध गुटखा पुरवठा करणाऱ्या गुटखा माफियांचा शोध घेणार काय ? 💥अवैध गुटखा प्रकरणातील १ आरोपी फरार तर २ आरोपीना न्यायालयाने सुनावली ३ दिवसांची पोलीस कोठडी💥

पुर्णा/तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवैध विषारी गुटख्याची तस्करी होत असल्याने पोलीस प्रशासन अवैध गुटखा तस्करी व विक्री विरोधात सतर्क झाले असून दि.०९ सप्टेंबर २०१९ रोजी पुर्णा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पो.नि.सुभाषराव राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप.नि.चंद्रकांत पवार तसेच सहकारी पोहेकॉ.विनोद रत्ने यांच्या पथकाने धाडसी कारवाई करीत मौ.कौडगाव पाटी जवळ मोटार सायकल वरुन गुटखा तस्करी करणारे २ आरोंपी शेख जुबेर शेख हबीब,गजानन राऊत यांना ताब्यात घेण्याची तसेच अवैध गुटखा साठा केल्या प्रकरणी मौ.एरंडेश्वर येथील मारोती घोरंबांड या आरोपीं कडून अवैध गुटखा साठा तसेच मोटार सायकल,मोबाईल असा १,२३,८८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कारवाई केली यातील शेख जुबेर शेख हबीब,गजानन राऊत यांना न्यायालयाने उद्या गुरुवार दि.१२ सप्टेंबर २०१९ पर्यंत ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या गुटखा तस्करी प्रकरणातील मारोती घोरबांड नामक आरोपी अद्यापही फरार असून सदरील आरोपी अटक झाल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध विषारी गुटख्याचा पुरवठा करणारा प्रमुख सुत्रधार अर्थात गुटखा माफिया कोण ? याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुर्णा पोलीस प्रशासन तालुक्यातील अवैध गुटखा माफियांची नांगी आवळण्यात कितपत यशस्वी होतात याकडे तालुक्याचेच नव्हें तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या