💥पुर्णा शहरातील मुख्य बाजारपेठ देशी-विदेशी दारु विक्रेत्यांच्या विळख्यात....!💥शहरातील संपूर्ण बाजार पेठेतील व्यापारी रहिवास्यांसह महिला विद्यार्थी विद्यार्थींना मद्यपीचा प्रचंड त्रास💥

पुर्णा/शहरातील मुख्य बाजार पेठेतील लोकमान्य टिळकरोड परिसरात भर वसाहतीत असलेल्या परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांच्या अनियंत्रित कारभारा मुळे परिसरातील रहिवास्यांसह या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्या महिला अबाल वृध्द शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थींनीना सैराट झालेल्या मद्यपींच्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरासह संपूर्ण तालुका संवेदनशील असून मागील दंगलींचा इतिहास पाहता दंगलग्रस्त परिसरात शासकीय नियमा प्रमाणे देशी-विदेशी दारुची दुकाने नसायला हवी परंतू सदरील दुकाने दंगलग्रस्त परिसरात तर आहेच याशिवाय मुख्य बाजारपेठेतील नागरी वसाहतीत असल्यामुळे तसेच सदरील दारु दुकाने शासनाच्या नियमाप्रमाणे न चालवता नियमबाह्य पध्दतीने तर चालवली जातच आहे

 याशिवाय संबंधित जैस्वाल वाईन शॉप या वाईन शॉप चालकाकडून नियमबाह्य पध्दतीने एमआरपी दराप्रमाणे दारु विक्री नकरता प्रत्येक ब्रँडच्या दारु मागे खरेदीदारास २० ते २५ रुपयें अतिरिक्त आकारले जात असल्यामुळे खरेदीदार व संबंधित वाईन चालकांमध्ये वेळोवेळी वाद निर्माण होत असल्याने केव्हा काय घटना होईल याची परिसरातील नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.शहरासह तालुक्यात प्रत्येक नामांकीत कंपनीच्या बनावट अर्थात बोगस दारुची मोठ्या प्रमाणे दारुची विक्री होत असल्यामुळे अनेकांची संसार उघड्यावर आल्याचे पाहावयास मिळत आहे.टिळकरोड परिसरातच असलेल्या वसंतलाल जैस्वाल या परवाना धारक देशी दारु दुकानदार आपली दारु दुकान वेळी अवेळी उघडत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यपींची जत्रा भरत असल्याने परिसरातील रहिवास्यांसह या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्या महिला अबाल वृध्द तसेच शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थींनींना या मार्गाने वावरने अत्यंत अवघड झाले असून परिसरात मद्यपी अक्षरशः धुमाकूळ घालतांना व येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना अश्लील शब्दांचा वापर करतांना पाहावयास मिळत आहेत याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे संबंधित परवाना धारक देशी-विदेशी दारु विक्रेते ड्रायडे म्हणजे बंद काळात याच परिसरात आपल्या काही हस्तकांकडून अवैध दारुही विक्री करीत असल्याने सार्वजनिक उत्सवांना मद्यपींकडून गालबोट लागल्याच्या घटना हीं वेळोवेळी घडतांना पाहावयास मिळत आहेत संबंधित परवाना धारक दारु विक्रेते राजकीय पक्ष संघटनांशी जवळीक साधून आपला कारोभार चालवीत असल्याने आपले कोण काय बिघडवणार या आवेशात मनमानी कारभार चालवतांना पाहावयास मिळत आहेत संबंधित परवाना धारक दारु विक्रेत्यांचे परभणी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याने संबंधित दारु विक्रेत्यांचा मनमानी आणी नियमबाह्य कारभार अधीकच बळावल्याचे दिसत आहे.त्यामुळे शहरात तसेच परिसरात केव्हा काय होईल याची प्रचंड भिती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. सदरील देशी-विदेशी दारु दुकाने तात्काळ शहरा बाहेर स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली असून या परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसत आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या