💥पुर्णा शहरातील आंबेडकर नगर परिसरात उघड्यावरील रोहित्रामुळे बकरीचा मृत्यू..!💥शहरातील अनेक भागातील उघडी रोहित्रे देत आहेत धोक्याची घंटा💥

पुर्णा/शहरातील अनेक भागात विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे विद्युत रोहित्र उघडी पडल्याने परिसरातील नागरिक तसेच बालकांसह जनावरांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून अश्याच प्रकारे शहरातील आंबेडकर नगर परिसरातील नगरसेवक उत्तम खंदारे यांच्या घरा समोर असलेल्या उघड्या विद्युत रोहित्रात विजेचा शॉक लागल्यामुळे बकरीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी घडली त्यामुळे नागरीकांमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या गलथान व हलगर्जी कारभारा विरोधात संताप व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच नागरी वसाहतींमध्ये विद्युत रोहित्र उघडी पडली आहेत तर काही भागात नागरी वसाहतींवरुन विद्युत वाहिण्या गेल्या आहेत विद्युत वितरण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर ही संबंधित विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
शहरातील कदम गल्ली परिसरालगत असलेल्या नवी आबादी परिसरातील नागरी वसाहतीतील घरांवरुन अश्याच प्रकारे विद्युत वाहिण्या गेल्या असून या भागातील नागरीकांनी या संदर्भात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्याचे समजते परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने दि.२६ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास विद्युत वितरण कंपनीची विद्युत वाहिनी (तार) तुटून रोहिदास आबाजी कदम यांच्या म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हैस मरुन त्यांचे तब्बल ७० ते ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले या घटने संदर्भात पुर्णा पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे दोन दिवसात या दोन घटना घडल्याने शहरात सव्वत्र संताप व्यक्त होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या