💥पुर्णेकरांच्या मनोभावे सेवेला अखेर गणपती बाप्पा पावले...!💥विसर्जनाच्या पुर्वसंध्येस पावसाला जोरदार सुरवात,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वरुण राजाने दिला दिलासा💥

पुर्णा/अनंत चतुर्दशी श्री.विसर्जनाच्या पुर्व संध्येला काल दि.११ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री ०८-०० वाजेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून तमाम पुर्णेकरांनी तसेच श्री.गणेश भक्तांनी ११ दिवसापासून श्री.गणेशाची सतत मनोभावे केलेल्या सेवेचे फलीत म्हणून गणेश महोत्सव सुरवाती पासून ते आज पावेतो गुरुवार दि.१२ सप्टेंबर २०१९ पर्यंत तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पाडण्यास सुरुवात झाल्याने श्री.गणपती बाप्पा मागील ५ वर्षापासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना पावल्याचे भक्तांमध्ये बोलले जात आहे.

असून काल रात्री ०८-०० वाजेपासून अद्यापही जोरदार पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी तालुक्यातील दुष्काळाचे सावट काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असून तालुक्यात खरीप हंगामातील मुग,उडीद,सोयाबीन,कापूस,ज्वारी तसेच भाजी-पाला-मका आदींच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसत असले तरीही शेतकऱ्यांच्या वाढलेल्या उत्पादनाला रोगराई तसेच किडीचे संकट मात्र निर्माण झाल्याचे दिसत असतांना कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे विघ्नहर्ता गणराया हे संकटही टाळणार असल्याचे दिसून येत आहे.शहरासह तालुक्यात रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली असतांना ही श्री.गणपती बाप्पांच्या भक्तांसह गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांतील उत्साह मात्र कमी झाल्याचे दिसले नाही जोरदार पाऊस सुरु असतांनाही गणेश भक्तांनी नृत्याचा मनमुराद आनंद घेतल्याचे शहरात तसेच ग्रामीण भागातही दिसून आले...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या