💥निवडणूक निरीक्षकांनी साधला नोडल अधिकारी यांच्याशी संवाद.....!💥निवडणूक खर्चा विषयी केले मार्गदर्शन💥
             
परभणी/विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी दोन खर्च निरिक्षक 95 - जिंतूर व 96 – परभणी करीता श्री.निलम बारण सोम आणि 97 -  गंगाखेड व 98 – पाथरी  करिता श्री.संकल्प नारायण सिंह आयआरएस दर्जाचे अधिकारी दाखल झाले असून त्यांनी चारही विधान सभाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व खर्च पथकाचे नोडल अधिकारी यांच्याशी निवडणूकीत होणाऱ्या खर्चाबाबतीत संवाद साधला व निवडणूका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध सुचना दिल्या.

            निवडणूक खर्च निरीक्षक यांनी सर्व संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन शनिवार दि.28 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांची उपस्थिती होती.

            बैठकीत श्री.सिंग यांनी निवडणूका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारांनी सतर्क रहावे, मतदान टक्केवारी वाठविण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी आयोगाच्या प्रत्येक घटकांनी पोलीस, प्रशासनाने समाजात शांततामय, विश्वासक वातावरण निर्माण करणेसाठी आटोकाट प्रयत्न करावेत. तसेच आयोगाच्या सुचनेनुसार उमेदवारांना बँक खात्यातून व्यवहार करावयास सांगावे, आदि निवडणूक खर्चाबाबत स्पष्ट निर्देश दिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या