💥पुर्णेतील रेल्वे स्थानकावर अनोळखी वयोवृध्द आजारी महिला मागील तिन दिवसापासून पडून...!💥रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलीस प्रशासनाचे ही दुर्लक्ष मानुसकीला काळीमा फासणारी घटना💥

पुर्णा/येथील रेल्वे स्थानक क्रमांक १ वरील जुन्या व नवीन दादऱ्याच्या मध्यभागी मागील तिन दिवसापासून अत्यंत आजारी अवस्थेत असलेली एक अनोळखी वयोवृध्द महिला अक्षरशः तडफडत पडली असून सदरील वृध्द महिलेकडे रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे माणूसकीला काळीमा फासणारे दृष्य आज पाहावयास मिळाले आहे.
प्रवासी सुरक्षेसह रेल्वे संपत्तीच्या सुरक्षेची जवाबदारी ज्यांच्यावर असते तेच या घटनेकडे दुर्लक्ष करीत असतील तर सर्वसामान्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत.रियझीम पाऊस थंडीसह उनाचाही तडाखा सोसत मरणासंण्य अवस्थेत पडलेल्या आजारी वृध्द महिलेला शासकीय दवाखान्यात पोहोचवण्याची माणूसकीही संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी दाखवायला तयार नसल्यामुळे प्रवासी वर्गामध्ये तिव्र असंतोष पसरला असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांनी त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे..  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या