💥आ.आव्हाड यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबत वापरला अपशब्द💥
पूर्णा/महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.जितेंद्र आव्हाड यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी पूर्णा येथे तिव्र निषेध करण्यात आला.
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली ही प्रतिक्रिया अयोग्य असून महाराजा बद्दल एक ही अपशब्द ऐकूण घेणार नाहीत तर गड किल्या बाबत घेण्यात आलेला निर्णय त्वरित रद्द करावा अश्या मागण्या करीत निषेध व्यक्त करण्यात आला
या बाबत तहसीलदार पूर्णा याना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर प्रताप कदम,राजूकदम,विष्णू कदम, सोमनाथ शिराळे, कौस्तुभ कदम,पप्पू भोंग,नितीन कदम,सोनाजी शिंदे,आकाश गोडबोले,आदीचया स्वाक्षऱ्या आहेत..
0 टिप्पण्या