💥अनुकंपा धारकांसाठी ऊर्जामंत्र्यांची ऑफर,15 लाख किंवा नोकरी...!💥अनुकंपा धारकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे ‘महावितरण’ आणि ‘महापारेषण’च्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश💥

ऊर्जा विभागातील अनुकंपा तत्वाकर सुमारे 1300 इच्छुक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. या इच्छुकांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑफर दिली आहे. नोकरी किंवा 15 लाख रुपये यापैकी एकाची निवड करा. याचा निर्णय डिसेंबरपर्यंत घ्या,असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी ‘महावितरण’ आणि ‘महापारेषण’च्या अधिकार्यांनाही दिले आहेत.ऊर्जा विभागातील अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. प्रतीक्षा यादी मोठी आहे. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित असणार्यांना 15 लाख रुपये देऊन वन टाइम सेटलमेंट किंवा त्वरित नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महावितरणमधील 1100 v महापारेषणमधील 222 इच्छुकांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. या बैठकीत ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविद सिंह, मराकिम कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) पवनकुमार गंजू उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या