💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 108 रुग्णवाहिकेची मागणी...!



💥सरपंच गयाबाई काळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी💥  


पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे हे गाव गोदावरी नदी काठी असून गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपासआहे.
गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
यात धानोरा काळे सह मुंबर, गोळेगाव,देऊळगाव, बानेगाव, कळगाव,माहेर येथील रुग्ण ही उपचारासाठी या आरोग्य केंद्रात येत असतात परंतु सध्या उपलब्ध असलेली छोटी  रुग्ण वाहिका अपुरी पडत आहे त्यामुळे पुढील उपचारासाठी रूग्णांना तातडीची रुग्णसेवा मिळत नाही त्यातच गरोदर माता व इतर रुग्णांसाठी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे.
             धानोरा काळे हे गाव दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरआहे त्यातच या  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मिळाला असून इमारतीचे बांधकाम चालू आहे .सध्या पावसाळ्याचे दिवस असून नदीवरील दिग्रस बंधारा पूर्ण भरला आहे.पाण्याचे बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे  तात्काळ  108ची रुग्नवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील सरपंच गयाबाई काळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी यांच्याकडे  लेखी निवेदन द्वारे केल्याचे सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या