💥"पुंजानी दि रिअल हिरो" मो.युसूफ पुंजाणी यांचा राजकीय पावर...!


💥युसुफ पुंजाणी यांनी कारंजा विधानसभा निवडणूक लढवली  अल्पमताने त्यांचा पराभव झाला💥

फुलचंद भगत
वाशिम- जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाची ताकद वाढली ती केवळ युसूफ पुंजाणी यांच्यामुळेच हे सत्य कोणीच नाकारू शकणार नाही. युसूफ पुंजाणी यांनी भारीप बहुजन महासंघात प्रवेश केला आणि चमत्कार घडण्यात सुरुवात झाली. युसुफ पुंजाणी यांनी कारंजा विधानसभा निवडणूक लढवली  अल्पमताने त्यांचा पराभव झाला. युसुफ पुंजाणी यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या तोंडाला फेस आणला केवळ अपघातानेच राजेंद्र पाटणी निवडून आले.  युसूफ पुंजाणी यांनी भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी पक्षाला बळकटी आणली. वाशिम जिल्ह्यात नगरसेवक निवडून येणे दिवास्वप्न वाटत असताना ३ नगर परिषद वर भारीपचा झेंडा फडकविला. कारंजा नगर परिषदवर एकहाती सत्ता घेतली. व बौद्ध समाजाचा  नगराध्यक्ष मताधिक्याने निवडून आणला., मंगरुळपीर नगरपरिषद वर भारिप बहुजन महासंघाचा झेंडा फडकविला. वाशिम जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाची ताकद वाढली.कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणत युसुफ पुंजाणी यांनी भारिप बहुजन महासंघाची सत्ता  प्रस्थापित केली.वाशिम नगराध्यक्ष  अल्पमताने पराभव झाला. युसुफ पुंजाणी नावाचे वादळ राजकारणात घोंघावत असतानाच भल्या भल्याच्या तोंडचे पाणी पळाले .युसुफ पुंजानी या वाघाला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी गुप्त खलबते झालित. वादळाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले .विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीचा अंदाज घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या युसुफ पुंजानी यांची सुपारी दिल्यानेच पक्षात बंडाळीची भाषा केली जात असल्याची चर्चा रंगली होती.हा पक्षातील अंतर्गत कलह असल्याचे काहींचे मत आहे. वादाची ठिणगी कारंज्यातून पडली. कारंजा चे नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यांत आणि जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्यात धुसफूस झाली आणि उघडउघड विरोध सुरू झाला. युसूफ पुंजानी यांनी डीपीटीसी निवडणूक लढवून उमेदवार निवडून आणला  जिल्ह्याध्यक्षांनी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करून विरोध करणाऱ्याना चपराक दिली. त्यामुळे भारिप मधील एका गटाला पुंजानी यांची उचभरारी व वर्चस्व सहन झाला नाही.व त्यांनी पुंजानी विरोधात वरिष्ठांना कडे कानाफुसी केल्याची चर्चा आहे. तसेच वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर कोणत्याच प्रकार चे अंकुश लावले नाही. त्यामुळे पुंजानी यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला.वरिष्ठांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकृत करून जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली व नव्याने गठीत ही केली.मात्र पक्षाने प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा स्वीकारला नाही. मात्र पुंजानी यांनी दोन्ही पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.पुंजानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याचा दुजोरा दिला.ते म्हणाले की फक्त पदाचाच राजीनामा दिला आहे.पक्षा मध्ये ते कायम असून पक्षश्रेष्ठीं ज्यांना वाशिम जिल्ह्याचा पदभार देतील त्यांच्या सोबत निष्ठेने पक्ष संघटन मजबुत करण्याकरिता सक्रिय कार्य करतील अशी ग्वाही दिली.
       आज जिल्ह्यात भारीपची ताकद वाढविण्यात पुंजाणी यांचा सिंहाचा वाटा आहे.नगराध्यक्ष, नगरसेवकानंतर भारीपचे आमदार बनविण्याचा पवार फक्त पुंजानी यांच्याचकडे आहे. व त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. राजकीय समीकरण बदलणारे दि रिअल हिरो युसूफ पुंजानीच ठरणार आहे.एवढे मात्र निश्चित!●●●● दृष्टिक्षेप ●●●●

♂ कारंजा- मानोरा विधानसभा मतदार संघामध्ये प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचे पानिपत करून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे मते घेऊन नामशेष असलेल्या भारिप बहुजन महासंघाला नवसंजीवनी देऊन वाशिम जिल्ह्यामध्ये भारिप बहुजन महासंघाचा वटवृक्ष निर्माण करण्याचे कार्य हाजी मो.युसूफ पुंजानी यांनी घडवून आणले.

 ♂ सतत ५ वर्षाच्या कालावधीत पक्ष प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने पुंजानी यांच्या वर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष पद सोपविले त्यांनी इमानेइतबारे कार्य करून या जिल्ह्यात नगर पालिका तसेच ग्रामपंचायत लढविली व जिल्ह्यातील चार तालुक्यात एकूण ३ नगराध्यक्ष,५२ नगरसेवक तसेच १८५ ग्राम पंचायत सदस्य निवडून आणले.

♂ पुंजानी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदावर नियुक्त केले. या पदाची जबाबदारी त्यांनी निष्ठेने सांभाळली आहे.पक्ष बांधणीसाठी तसेच पक्षाच्या आदेशाने व जनहितार्थ अनेक आंदोलने व इतर उपक्रम प्रमाणिकतेने व सक्रियपणे सांभाळून जनतेला न्याय मिळवून दिला आहे.

♂ परंतु भारिप बहुजन महासंघा करीता तन-मन धनाने झटणाऱ्या पुंजानी यांना येन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक कार्यक्रमात डावलण्यात आले.व पक्षांमधील पदाधिकाऱ्यांनी स्वतः च्या लालसपोटी खोटे संदेश पसरून पुंजानी यांना बदनाम करण्याचा कट रचला

♂ मात्र या गोष्टीची पक्षश्रेष्ठींना माहिती मिळाल्यावर ही त्यांनी कोणत्याच प्रकारची कारवाई त्या तालुकाध्यक्षवर केली नाही. व या मुळे पुंजानी समर्थकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. या अस्थितेतून पक्षाला आकाश भरारी देणारे हाजी.मो.युसूफ सेठ पुंजानी यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा १३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांना पाठविला.

♂ राजीनामा पाठविल्यानंतर कार्यालयीन सचिव रतन बनसोडे यांच्या स्वाक्षरीने वाशिम जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आले.

फुलचंद भगत,वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या