💥तणावमुक्त जीवनशैली हाच खरा रोग प्रतिबंध - डॉ. संतोष मालपाणी💥लायन्स क्लबच्या वतीने पूर्णेकरांच्या निरामय आरोग्यासाठी 'विशेष आरोग्यावर बोलू काही' हा कार्यक्रम संपन्न 💥


पूर्णा - लायन्स क्लब पूर्णा च्या वतीने पूर्णेकरांच्या निरामय आरोग्यासाठी विशेष  " आरोग्यावर बोलू काही " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 16-08-2019 रोजी विद्याप्रसारिणी सभा शाळा पूर्णा येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लॉ.डॉ. विनयजी वाघमारे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. संतोष मालपाणी प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ नांदेड हे होते.

रोपटे आणि ग्रंथभेट देऊन  अनोख्या पद्धतीने स्वागत झाल्यानंतर प्रास्ताविक लॉ.डॉ. हरीभाऊ पाटील यांनी केले. व डॉ.संतोषजी मालपाणी प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ नांदेड यांच्या कार्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी डॉ.संतोष मालपाणी यांनी मनोरंजक पद्धतीने उपस्थित पूर्णेकरांशी हृदयसंवाद साधला. बैठे काम, आरामदायी जीवनशैली, अनियंत्रित,असमतोल आहार गतिमान जीवन, सतत चाललेली जीवघेणी स्पर्धा, एकमेकांना स्पर्धक समजून चाललेल्या चढाओढीमुळे जीवनात ताणतणावांचे समायोजन करता न आल्याने शारिरीक आणि मानसिक संतुलन बिघडले आहे ते कायम ठेवण्यासाठी संथ गतीने आनंददायी पद्धतीने जीवन जगा. नियमित व्यायाम, संतुलित - समतोल आहार, आनंदी जीवनशैलीचा अंगिकार केल्यास मधुमेह, बी पी असे आजार टाळता येऊ शकतात. ज्यांना हे आजार झाले आहेत त्यांनी ही घाबरून न जाता आपल्या जीवनशैलीत आवश्यक तो बदल करून नियमित औषधोपचार, व्यायाम यातून आपण चांगले जीवन जगू शकतो.
अशा पद्धतीचे अनमोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना लायन्स क्लब पूर्णाचे अध्यक्ष लॉ.डॉ.विनयजी वाघमारे यांनी अल्पावधीतच पूर्णा शहर आणि परिसरात लायन्स क्लब पूर्णा ने आपली वेगळी ओळख निर्माण करताना अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. आरोग्य, शिक्षण, सेवा या मार्गावरील लायन्स क्लब पूर्णाची वाटचाल अशीच निरंतर सुरू राहील त्यासाठी सर्वांनी भरभरून सहकार्य करावे असे आवाहन केले.
सूत्रसंचालन लायन्स क्लब पूर्णाचे कोषाध्यक्ष लॉ.अमृतराजजी कदम यांनी केले. तर
आभार प्रदर्शन ला.हिराजी भोसले यांनी करताना सांगितले की दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर आपल्या वाट्याला पाच ते दहा मिनिटे येतात. मात्र आज विनाशुल्क खास नांदेडहून येऊन आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला तब्बल दीड तास आले असून प्रत्येक व्यक्तीने अशा जीवनशैलीचा अंगिकार केल्यास मधुमेह, बी. पी. पासून आपण आपला स्वतःचा बचाव करू शकतो. डॉ.संतोषजी मालपाणी व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक डॉ. दत्तात्रयजी वाघमारे , भुजंरावजी कदम, सीताराम अप्पा एकलारे, श्रीनिवासजी काबरा शेठ, संतोषजी एकलारे, श्याम कदम, सुभाष मालपाणी व सर्व उपस्थित पूर्णेकरांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब पूर्णाचे सचिव लॉ. डॉ.अजयसिंह ठाकूर, उपाध्यक्ष लॉ.राजेश धूत, लॉ.गुलाबराव इंगोले,लॉ.प्रमोद मुथा,लॉ.नागनाथ भालेराव, लॉ.डॉ.दिलीप शृंगारपुतळे, लॉ. डॉ.गंगासागरे, लॉ. हनुमानजी अग्रवाल , लॉ. राजेशजी अग्रवाल, लॉ. अॅड. सईद साहेब व इतर सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या