💥पूर्णेत मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत साजरा झालाय आगळावेगळा वाढदिवस...!💥शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी भेटवस्तू,खेळणी,अल्पोपहारासह केक वाटप💥 

पूर्णा प्रतिनिधी ...वाढदिवस म्हंटलं की डीजे आणि कंर्णककर्कश वाद्यांचा गोंगाट आणि तोंडाला केक फासत केलेले विकृत चाळे ...असाच आजकालच्या वाढदिवसांचा कार्यक्रम साजरा होत असताना पूर्णेतील किराणा व्यापारी असलेल्या एका तरुणाने आदर्श वाढदिवस कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण कुठलाही गाजावाजा न करता दाखवून दिले आहे.
आपल्या मुलाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा आणि त्यातून काहीतरी समाजोपयोगी काम घडावे यासाठी किराणा दुकानदार असलेल्या संवेदनशील पद्धतीने विचार करणाऱ्या राजू यशके यांनी पूर्णेच्या विठ्ठलराव मोरे मूकबधिर विद्यालयात आपला मुलगा सिद्धिविनायक याचा सहावा वाढदिवस साजरा केलाय तर यावेळी त्यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी भेटवस्तू,खेळणी,अल्पोपहार आणि केक वाटप करीत हा आगळावेगळा वाढदिवस ह्या मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसोबत साजरा केला तर या वेळी सदर  चिमुकल्यांच्या तोंडावर समाधानाचे हास्य फुललेलं पाहायला मिळालंय तर श्री यशके यांनी या गोष्टीची प्रसिद्धी होऊ नये याचीही खबरदारी घेतलीय म्हणून हा वाढदिवस विशेष असा म्हणावा लागेल..
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम,शहरातील प्रसिद्ध  डॉ.शंकर बारटक्के, देगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कैलाश इंगोले आदींसह संपूर्ण यशके कुटुंबीय उपस्तिथ होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या