💥शालेय पोषण आहारातून २२ विद्यार्थ्यांसह प्राचार्यांना विषबाधा...!💥कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेत आज घडली घटना💥

पुण्यातील कात्रज भागातील रामभाऊ म्हाळगी शाळेत मध्यान्ह भोजनावेळी २२ विद्यार्थ्यांसह प्राचार्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेत आज सकाळीसाडे दहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत मसाले भात माध्यन्ह भोजनात देण्यात आला होता. हा भात खाल्यानंतर काही मिनिटांनी २२ मुलांसह शाळेच्या प्राचार्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विषबाधा झालेल्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या