💥पुर्णा शहरातील महाविर नगर परिसरातील मा.नगरसेवकाच्या घरात धाडसी चोरी...!💥नासीर थारा यांच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास💥

पुर्णा/ शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाविर नगर परिसरात राहणाऱ्या एक माजी नगरसेवक तथा प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरात कोणी ही नसल्याचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्यांनी  घर फोडून धाडसी चोरी केल्याची घटना गुरवार दि.२२ अॉगस्ट २०१९ रोजी घडली असून या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातील अलमारीत ठेवलेले ७० हजार नगदी व सुमारे १७ तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवल्याची माहिती त्यांचा मुलाने दिली आहे.
   सविस्तर वृत्त असे की शहरातील अगदी मध्यभागात असलेल्या व अत्यंत गजबजलेली उच्चभ्रू वसाहत असलेल्या महावीरनगर मध्ये पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा प्रतिष्ठित व्यापारी नासीर आबुबकर थारा राहतात.थारा हे आपल्या कुटुंबीयांसह मागील ३ ते ४ दिवसांपूर्वी गुजरात येथे आपल्या मुलीकडे गेले होते.घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घरात घुसून कपाटात ठेवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख ७० हजार रुपये आसा ऐवज लंपास केला.सकाळी चोरी झाल्याचे घराच्या शेजारीच असलेल्या त्यांच्या बंधुला ही बातमी समजली तेव्हा त्यांनी ही माहिती पुर्णा पोलिसांना दिली.ह्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पो.उप.निरीक्षक चंद्रकांत पवार,समीर पठाण, अर्जुन रणखांब निलेश पोते घटनास्थळी तात्काळ पोहोचले काही वेळात त्यांनी  श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.सदरील घटनेची माहीती मिळताच औरंगाबाद येथे मा.नगरसेवक नासीर थारा यांचा मुलगा हुनेन नासेर थारा यांनी संध्याकाळी पुर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.याप्ररणी पुर्णा पोलीस ठाण्यात कलम ४५७,३८० आन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील सत्तर हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेले.तर  सोने चांदीच्या चोरी बाबतीत तंतोतंत आकडा माहिती नसल्यामुळे घरातील महिला बाहेरगावाहून आल्यावर देवू असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.घटनास्थळी पोलीस उप विभागीय अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले तसेच  पोलीस निरीक्षक सुभाष राठोड, यांनी भेट दिली आहे.अर्जुन रणखांब हे पुढील तपास करीत असून यापूर्वी ही शहरातील अली नगर इकबाल नगर,पंचशिल नगर,गवळी गल्ली परिसरात अश्याच प्रकारे घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी धाडसी चोऱ्या करुन पोलीस प्रशासनाला आव्हान दिल्याच्या घटना घडल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाने श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करुन तपासाच्या दिशेने पावले उचलली होती परंतु या धाडसी चोऱ्यांचा अद्यापही तपास लागलेला नाही त्यामुळे मागील घटनां प्रमाणे या आव्हानात्मक धाडसी चोरीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनास कितपत यश येते याकडे पुर्णेकरांचे लक्ष निश्चितच राहणार आहे...  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या